नीरा-भीमा कारखान्याची २१०० रुपये पहिली उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 02:17 AM2018-12-15T02:17:55+5:302018-12-15T02:19:01+5:30

बँक खात्यात होणार जमा; हर्षवर्धन पाटील यांची माहिती

The first pick of 2100 rupees for Neera-Bhima factory | नीरा-भीमा कारखान्याची २१०० रुपये पहिली उचल

नीरा-भीमा कारखान्याची २१०० रुपये पहिली उचल

Next

बावडा : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचा चालू सन २०१८-१९ चा ऊस गळीत हंगाम उत्कृष्टरीत्या चालू आहे. या हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाला रु. २१०० प्रमाणे पहिली उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शहाजीनगर येथे दिली.

ते म्हणाले, की कारखान्याने आजअखेर २ लाख १२ हजार ७९० टन उसाचे गाळप पूर्ण करून २ लाख १५ हजार ९८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आजचा साखर उतारा १०.५२ टक्के असून सरासरी साखर उतारा १०.३० टक्के आहे. कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पातून आजअखेर १ कोटी १९ लाख ४६९५१ युनिट वीज एक्स्पोर्ट केली आहे. आसवनी प्रकल्पातून ३४ लाख ९८ हजार ५४६ लिटरचे उत्पादन घेण्यात आले आहे.

शेटफळ हवेली तलाव लाभक्षेत्रातील गावांमधील ऊसपिकाला गेल्या मे महिन्यापासून पाणी मिळालेले नव्हते. त्यामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या या सर्व उसाची कारखान्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नुकसान सहन करून लवकर तोडणी केली आहे. या उसाला कपात न करता इतर शेतकºयांप्रमाणे दर दिला जाईल. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील पाण्याअभावी जळून चाललेल्या इतर भागातील उसाची शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून प्राधान्याने तोडणी केली जाईल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी पाटील यांनी कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व कारखान्याशी संबंधित सर्व घटनांचे अभिनंदन केले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, तानाजीराव देवकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, अशोक वणवे, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने व अधिकारी उपस्थित होते.

नीरा भीमा कारखान्याचा चालू गळीत हंगामातील उसाचा अंतिम दर हा इतर कारखान्यांच्यातुलनेत निश्चितपणे अधिकचा असेल, अशी ग्वाहीही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी दिली. तसेच चालू गळीत हंगामात कारखान्याने ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकºयांनी आपला सर्व ऊस नीरा भीमा कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

Web Title: The first pick of 2100 rupees for Neera-Bhima factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.