केरळच्या नागरिकांसाठी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 09:05 PM2018-08-21T21:05:35+5:302018-08-21T21:06:44+5:30

केरळच्या पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला अाहे.

Fergusson students' help for Kerala's citizens | केरळच्या नागरिकांसाठी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

केरळच्या नागरिकांसाठी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

Next

पुणे : केरळमध्ये अालेल्या पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले अाहे. केरळमधील नागरिकांसाठी प्रत्येकजण अापअापल्या पद्धतीने मदत करत अाहेत. या मदतीमध्ये विद्यार्थीसुद्धा पुढे अाहेत. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थी अाता पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून अाले अाहेत. या विद्यार्थ्यांनी अाैषधे, बिस्कीट, सॅनिटरी नॅपकिन, गरम कपडे, पिण्याचे पाणी अादी जमा करुन अाज ही मदत केरळकडे पाठवण्यात अाली. 

    राष्ट्रीय सेवा योजनेच्या 23 विद्यार्थ्यांनी यात पुढाकार घेतला. यात केरळ येथील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश हाेता. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदत करण्यात यावी अशा प्रकारचे संदेश विद्यार्थ्यांना शुक्रवारी पाठविण्यात आले. याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  शनिवारी काही प्रमाणात मदत पाठविण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी अभिषेक कुशारे यांने दिली.
    
    कुशारे म्हणाला, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यातून सामाजिक कार्य करण्यात येते. शुक्रवारी फेसबूक व इतर सोशल माडियाच्या माध्यमातून मदतीचे आव्हान करण्यात आले होते. त्याला सकारात्मक दाद देत विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांनी भरभरून मदत केली. शहरातील विविध भागातून ही मदत आमच्याकडे आली असून अाज जनकल्याण समितीच्या माध्यातून ही केरळकडे मदत रवाना करण्यात अाली.

Web Title: Fergusson students' help for Kerala's citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.