वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा अंत, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:22 AM2018-01-05T02:22:00+5:302018-01-05T02:22:06+5:30

खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाºया लहानमोठ्या डोंगर व टेकड्यांना वणवा लागत असल्याने या वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अंत होत असल्याच्या घटना घडत आहेत.

The end of tree and wildlife in the forest, the western part of Khed taluka damages | वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा अंत, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात हानी

वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा अंत, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात हानी

Next

आंबेठाण - खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाºया लहानमोठ्या डोंगर व टेकड्यांना वणवा लागत असल्याने या वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अंत होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत, याकरिता वन विभागाने लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला आणि वासुली ते वांद्रा असा विस्तार असलेला भामचंद्र डोंगर तर अशा आगीने काही ठिकाणी काळाठिक्कर पडला आहे. वन विभागाने सर्वच डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. डोंगरावर गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी, रानआले, करवंदे, सोनजाई, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल,रानकोंबड्या, मोर, सापांच्या विविध प्रजाती, गवतावरील कीटक यांसारखे असंख्य पशु-पक्षी आढळतात.
मागील अनेक वर्षांपासून या डोंगरांवर वणवे लागल्याच्या घटना घडत आहेत. यापैकी बहुतेक वणवे हे मानवनिर्मित आहेत. या वणव्यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या हानीबरोबरच जंगली प्राणी-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. या वणव्याला रोखण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचे वास्तव यातून पुढे आले आहे. वणवे रोखण्यासाठी व्यापक जनजागृतीची मोहीम राबवून वेळोवेळी डोंगरावर पट्टे काढणे गरजेचे असल्याचे निसर्गप्रेमी सांगत आहेत. डोंगरावर विविध रंगीबेरंगी फुलपाखरे मोठ्या संख्येने असतात. अनेक प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही अशा वणव्यामुळे अडचणीत सापडल्या जातात.
दिवसागणिक कमी होत चाललेली जंगले आणि त्यामुळे कमी होत असलेले वन्यजीव यांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक कायदे केले असले, तरी वन्यजीव आजही जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड करताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस मानवी वस्ती डोंगराळ भागात सरकत आहे.
जंगलातील झाडांच्या व पाण्याच्या ठिकाणी मानवाने मोठे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तरस,कोल्हे, बिबट्या, हरीण, ससे, रानडुकरे, रानमांजर यासारखे अनेक छोटे मोठे भूचर प्राणी यांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून असे प्राणी मानवी वस्त्यांमधे प्रवेश करीत आहे.

ंजनावरांना चाराटंचाई : जागा विकण्यासाठी हिंसक प्रकार

वणव्यांमुळे डोंगरावरील वाळलेले गवत जळून गेल्याने स्थानिक शेतकºयांच्या जनावरांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चारा टंचाई निर्माण होते. खेड तालुक्यात मोठ्या संख्येने कारखानदारी उभी राहिली असल्याने जागेला सोन्याचा भाव आला आहे. सपाट व चांगली जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी डोंगर व टेकड्यांवरील जागा विकून करोडो रुपये कमविले आहे.

अशा ठिकाणी अनेक स्थानिक नागरिक आग लावून देतात. कारण जुना चारा जळून गेल्यावर नवीन चारा चांगल्या प्रतिचा येतो, असेही अनेक लोक सांगतात. परंतू अशा वेळी लावण्यात आलेली आग ही आटोक्यात न आल्याने संपूर्ण डोंगरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत,सामाजिक संस्था तसेच प्राणिप्रेमींना एकत्रित करुन जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

1 अनेक वर्षांपासून या डोंगरांवर वणवे लागल्याच्या घटना घडत आहेत.
2 या वणव्याला रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचे वास्तव यातून पुढे आले

Web Title: The end of tree and wildlife in the forest, the western part of Khed taluka damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.