ठेकेदारांना कर्मचाऱ्यांची नोंदणी सक्तीची करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:11 AM2018-05-08T04:11:34+5:302018-05-08T04:11:34+5:30

महापालिकेच्या विविध प्रकारच्या विकासकामांत बांधकाम करणाºया ठेकेदारांना आता त्यांच्याकडे काम करणाºया कर्मचाºयांची नोंदणी करणे सक्तीचे करण्यात येणार आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या या मागणीवर प्रशासन सकारात्मक असून लवकरच तसा प्रस्ताव पक्षनेत्यांसमोर व नंतर सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

 Employees are required to register the contract | ठेकेदारांना कर्मचाऱ्यांची नोंदणी सक्तीची करणार

ठेकेदारांना कर्मचाऱ्यांची नोंदणी सक्तीची करणार

Next

पुणे  - महापालिकेच्या विविध प्रकारच्या विकासकामांत बांधकाम करणाºया ठेकेदारांना आता त्यांच्याकडे काम करणाºया कर्मचाºयांची नोंदणी करणे सक्तीचे करण्यात येणार आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या या मागणीवर प्रशासन सकारात्मक असून लवकरच तसा प्रस्ताव पक्षनेत्यांसमोर व नंतर सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.
राज्य सरकारने अशा ठेकेदारांकडे काम करणाºया बांधकाम कर्मचारी तसेच मजुरांना होणाºया अपघातांमध्ये, आजारांमध्ये मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. राज्यातील सर्व बांधकाम ठेकेदारांना त्यांच्याकडे असणाºया सर्व कर्मचाºयांची या मंडळात नोंदणी करण्याविषयी सांगण्यात आले आहे. हे ठेकेदार ज्या संस्थांची कामे करतील त्या संस्थांना ठेकेदारांच्या बिलातून १ टक्का रक्कम मंडळाचा निधी म्हणून कपात करण्याचे अधिकारही सरकारने दिले आहे.
पुणे महापालिकाच दरवर्षी या कायद्यान्वये मंडळाकडे ८० ते ९० कोटी रुपये जमा करत असते. त्या तुलनेत महापालिकेच्या बांधकाम ठेकेदारांनी त्यांच्याकडील मंजुरांची नोंदणीच मंडळाकडे केली नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे महापालिकेचे कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर यांनी सांगितले.
महापालिकेची विविध प्रकारची बांधकामे करणारे किमान ३ हजार तरी अधिकृत ठेकेदार आहेत. त्यांच्या बिलातून नियमानुसार १ टक्का कपात होतच असते. त्यामुळेच त्यांना नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद मिळाला नाही तर त्यांचे बिल अदा करताना कामगारांची नोंदणी केली असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे करण्याचा विचार सुरू आहे असे दौंडकर म्हणाले.
बांधकाम मजुराने फक्त ९० दिवस काम केले तरीही त्याची मंडळाकडे नोंदणी करणे ठेकेदारांना बंधनकारक आहे. बहुसंख्य बांधकाम मंजूर अशिक्षित तसेच गरीब कष्टकरी असतात. बांधकामांवर काम करताना अनेकदा अपघात होतात. त्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. ठेकेदार त्यांना वाºयावर सोडतात.
नोंदणी केलेल्या बांधकाम मजुरांना २८ प्रकारच्या योजनांचा लाभ नोंदणी झालेल्या कर्मचाºयाला मिळू शकतो.

मजुरांनीही ठेकेदाराकडे नोंदणीचा आग्रह धरावा

बाणेर येथे मध्यंतरी एका इमारतीच्या १३ व्या मजल्याचा स्लॅब कोसळून १२ कामगार मृत्युमुखी पडले होते. त्यांची नोंदणी केली नव्हती, मात्र कामगार कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून त्या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना मंडळाच्या वतीने आर्थिक मदत मिळवून देण्यात आली होती. त्यामुळे ठेकेदारांकडे काम करणाºया मजुरांनीच आता आपल्या ठेकेदाराकडे मंडळाकडे त्यांची नोंदणी करून घेण्याचा आग्रह धरावा.
- शिवाजी दौंडकर, कामगार कल्याण अधिकारी

बहुसंख्य कामगार हे दुष्काळी भागातून पोट भरण्यासाठी आलेले असतात. कष्टकरी व हातावर पोट असलेल्या या कामगारांना त्यांच्यावरील आपत्तीच्या काळात मदत करता यावी यासाठी सरकारने मंडळ स्थापन केले आहे. त्यामुळेच महापालिकेच्या बांधकाम ठेकेदारांनी त्यांच्याकडे असलेल्या मजुरांची नोंदणी करणे त्यांना सक्तीचे करावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर

Web Title:  Employees are required to register the contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.