कार्यालय रिकामे करा, तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसलाही झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:43 AM2018-01-17T05:43:57+5:302018-01-17T05:44:11+5:30

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काँग्रेसप्रणीत इंटक

Embarrassed office, Tukaram Mundhe's Congress suffered a setback | कार्यालय रिकामे करा, तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसलाही झटका

कार्यालय रिकामे करा, तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसलाही झटका

Next

पुणे : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काँग्रेसप्रणीत इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.
राष्ट्रवादी कामगार युनियनचे कार्यालय ‘पीएमपी’च्या भांडार विभागासमोरील इमारतीत काही वर्षांपासून होते. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरातच हे कार्यालय रिकामे करण्याची नोटीस संघटनेला बजावली होती. मुदतीपूर्वी तीन महिने आधीच कार्यालय ताब्यात घेण्यात आले. याला संघटनेच्या वतीने तीव्र विरोधही करण्यात आला.
प्रशासकीय कारणासाठी ही इमारत आवश्यक असल्याने ताब्यात घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने त्या वेळी स्पष्ट केले होते. आता हीच वेळ पीएमपी कामगार संघटनेवर (इंटक) आली आहे. पीएमपी प्रशासनाने सोमवारी इंटकला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.

करार मोडणे बेकायदेशीर
इंटकचे कार्यालय मुख्य इमारतीशेजारील दुसºया इमारतीमध्ये आहे. ते रिकामे करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. काही महिन्यांपासून कार्यालयाचे भाडे थकले आहे. तसेच, हे कार्यालय प्रशासकीय कारणासाठी आवश्यक असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आल्याचे समजते. या नोटिशीवर संघटनेच्या पदाधिकाºयांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.हे कार्यालय इंटकला १९५९मध्ये ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आले आहे. त्यासाठी प्रतिमहिना एक रुपया भाडे आकारले जाते. औद्योगिक विवाद कायद्यानुसार हा करार झाला आहे; त्यामुळे अशा प्रकारे तो मोडणे बेकायदेशीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे संघटनेकडून या कारवाईविरोधात कायदेशीर पाऊल उचलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Embarrassed office, Tukaram Mundhe's Congress suffered a setback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.