अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, पहिल्या फेरीत ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 04:37 AM2018-07-06T04:37:46+5:302018-07-06T04:37:55+5:30

पुणे व पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील आॅनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेची प्रथम गुणवत्ता यादी गुरुवारी सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात आली.

 Eleventh's first quality list is announced, in the first round, 41,961 students are admitted | अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, पहिल्या फेरीत ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, पहिल्या फेरीत ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना प्रवेश

Next

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील आॅनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेची प्रथम गुणवत्ता यादी गुरुवारी सकाळी अकरा वाजता
जाहीर करण्यात आली. त्यानुसार कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी या शाखेत पहिल्या फेरीतून ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून यात प्रथम पसंतीक्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार १८९ एवढी आहे. तर ३३ हजार ९७८ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळवता आला
नाही. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकरिता यावर्षी ७५ हजार ९३९ अर्ज प्राप्त झाले होते.
कला, विज्ञान,वाणिज्य व एमसीव्हीसी शाखा (मराठी व इंग्रजी माध्यम) यांची पहिल्या फेरीनुसार सर्वाधिक प्रवेश विज्ञान शाखेत झाले असून त्याची ते १८६३८ इतके आहेत. त्या पाठोपाठ वाणिज्य (इंग्रजी माध्यम) ११९३८, वाणिज्य (मराठी माध्यम) ६००१, कला शाखा (मराठी माध्यम) ३०८८, कला (इंग्रजी माध्यम) १४७२ आणि एमसीव्हीसी ३२८ (इंग्रजी माध्यम), ४२६ (मराठी माध्यम) विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.
शाखानिहाय वर्गीकरण केल्यास सर्वाधिक अर्ज विज्ञान शाखेकरिता आले असून त्याची संख्या ३२ हजार ७५९ आहे. यानंतर अनुक्रमे वाणिज्य (इंग्रजी) २४३१५, वाणिज्य (मराठी) ११६४१, कला (मराठी) ४६९६, कला (इंग्रजी) २३३७, एमसीव्हीसी (मराठी) ७८, इंग्रजी माध्यमात ११३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सूचना
आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात आॅनलाईन अलॉट झालेल्या यादीप्रमाणे विद्यार्थी व पालक महाविद्यालयात आल्यानंतरच त्यांचे प्रवेश नियोजित वेळेत आॅनलआआॅईन अपलोड करणे आवश्यक आहे.
विद्यार्थी किंवा पालक महाविद्यालयात प्रवेशासाठी न आल्यास आवश्यक ती कागदपत्रे सादर न करताच कोणत्याही विद्यार्थ्याला परस्पर आॅनलाईन अ‍ॅडमिट करू नये.
विद्यार्थी / पालक यांचा प्रवेश घेणेबाबतचा निर्णय निश्चित असेल तरच आवश्यक कागदपत्रे घेऊन (उदा. मूळ दाखला, गुणपत्रक) आॅनलाईन प्रवेश अपलोड करावेत. संपूर्ण फी भरण्याची सक्ती करू नये.
विहित वेळेत आॅनलाईन अपलोड न केल्यास तसेच आर्थिक कारणाकरिता विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील, अशा प्रकारच्या सर्व सूचना पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी केल्या आहेत.

पहिल्या यादीत नाव आलेल्यांनी प्रवेश घेणे आवश्यक : अन्यथा प्रक्रियेबाहेर
पसंतीक्रमांक १ अँलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम स्टुडंट लॉगिन मध्ये जाऊन प्रोसिड बटणावर क्लिक करणे गरजेचे आहे. तरच त्यांचे नाव कॉलेजच्या यादीमध्ये समाविष्ट होईल व त्यानंतर कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रे देऊन प्रवेश आॅनलाईन अपलोड करुन प्रवेश निश्चित करावा व प्रवेश मिळाल्याची प्रिंट घ्यावी. आपल्या पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाल्याने सहा ते सात जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश आॅनलाईन निश्चित करणे बंधनकारक आहे. जे विद्यार्थी पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झालेले असतानादेखील प्रवेश घेणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित तिसऱ्या फेरीपर्यंत त्यांचा इयत्ता अकरावी आॅनलाईन प्रवेश अर्जाचा क्रमांक व दहावी बोर्डाचा बैठक क्रमांक प्रतिबंधित केला जाईल.
पसंतीक्रमांक २ ते १० पैकी कोणत्याही क्रमांकाचे कॉलेज मिळालेले आहे, त्यांनी प्रथम स्टुडंट लॉगिन मध्ये जाऊन प्रोसिड या बटणावर क्लिक करणे गरजेचे आहे. तरच, त्यांचे नाव कॉलेजच्या यादीमध्ये समाविष्ट होईल व त्यानंतर कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रे देऊन प्रवेश आॅनलाईन अपलोड करुन प्रवेश निश्चित करावा व प्रवेश मिळाल्याची प्रिंट घ्यावी.
पसंती क्रमांक २ ते १० अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना जर तो प्रवेश मान्य नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी दुसºया गुणवत्ता यादीची वाट पाहावी. अलॉट झालेला प्रवेश तात्पुरत्या स्वरूपात घेणे अथवा महाविद्यालयात जाऊन प्रवेश रद्द करणे अशा कोणत्याही कार्यवाहीची आवश्यकता नाही.
प्रवेशाच्या वेळी
आवश्यक ती कागदपत्रे विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झालेले नाहीत, त्यांना पुढील फेरीत गुणवत्ता व वैधानिक आरक्षणानुसार
उपलब्ध जागेवर प्रवेश मिळतील. अशा विद्यार्थ्यांनी पुढील फेरीची वाट पाहावी.
पसंतीक्रमांक २ ते १० पैकी कोणत्याही पसंतीक्रमांकाचे महाविद्यालय अलॉट झाले असल्यास व महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतलेला असल्यास व नंतर प्रवेश काही कारणास्तव रद्द केला असल्यास अशाही विद्यार्थ्यांचा अकरावी आॅनलाईन प्रवेश अर्जाचा क्रमांक व दहावी बोर्डाचा बैठक क्रमांक प्रतिबंधित केला जाणार आहे. त्यामुळे प्रवेश घ्यायचा किंवा नाही, हे पालक व विद्यार्थी यांनी विचारपूर्वक ठरवूनच निर्णय घ्यावा. त्यानंतर कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही. याची नोंद घ्यावी.

यादीनुसार प्रवेश ...
रिक्त जागांचा तपशील आणि कट आॅफ : ६ ते ९ जुलै
गुण प्रसिद्ध : १० जुलै
भाग १ आणि २ भरण्यासाठी उपलब्ध : १० ते ११ जुलै
दुसरी नियमित गुणवत्ता यादी : १३ जुलै
यादीनुसार प्रवेश : १४ ते १६ जुलै
रिक्त जागा जाहीर : १७ जुलै
भाग १ आणि २ भरणे : १८ ते १९ जुलै
तिसरी गुणवत्ता यादी : २३ जुलै
यादीनुसार प्रवेश घेणे : २४ ते २५ जुलै
रिक्त जागा आणि तिसºया यादीतील
कट आॅफ जाहीर : २६ जुलै
भाग १ आणि २ भरणे : २६ ते २७ जुलै
चौथी गुणवत्ता यादी जाहीर : २९ जुलै
यादीनुसार प्रवेश घेणे : ३० ते ३१ जुलै

Web Title:  Eleventh's first quality list is announced, in the first round, 41,961 students are admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे