Pune: वीजबिल थकल्याचा बहाणा करून वृद्ध महिलेची फसवणूक ; पर्वती परिसरातली घटना

By भाग्यश्री गिलडा | Published: March 18, 2024 03:18 PM2024-03-18T15:18:01+5:302024-03-18T15:18:44+5:30

दांडेकर चौक परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेने रविवारी (दि. १७) पर्वती पोलिसांना फिर्याद दिली आहे...

Elderly woman cheated by pretending to pay electricity bill; An incident in the mountain area | Pune: वीजबिल थकल्याचा बहाणा करून वृद्ध महिलेची फसवणूक ; पर्वती परिसरातली घटना

Pune: वीजबिल थकल्याचा बहाणा करून वृद्ध महिलेची फसवणूक ; पर्वती परिसरातली घटना

पुणे : महावितरणचे वीजबिल अपडेट होत नाही असे सांगून सायबर चोरट्यांनी पर्वती परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत दांडेकर चौक परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेने रविवारी (दि. १७) पर्वती पोलिसांना फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार हा प्रकार शुक्रवारी (दि. १६) घडला आहे. तक्रारदार महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधून. महावितरणकडून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे मागील महिन्याचे वीजबिल अपडेट झालेले नाही असे सांगितले. त्यांनतर वीजबिल बाकी असल्याचे सांगून ते भरण्यासाठी क्विक सपोर्ट नावाचे अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. अप्लिकेशनचा वापर करून मोबाईलचा संपूर्ण ताबा मिळवला.

त्याद्वारे खासगी माहितीचा वापर करून फिर्यादींच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख ४९ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गावित हे करत आहेत.

Web Title: Elderly woman cheated by pretending to pay electricity bill; An incident in the mountain area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.