लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी - रवींद्र धारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:16 AM2018-07-10T01:16:26+5:302018-07-10T01:16:44+5:30

पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात.

 Effective implementation of schemes through public participation - Ravindra Dharia | लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी - रवींद्र धारिया

लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी - रवींद्र धारिया

Next

पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. मात्र, त्यातील किती झाडांची जोपासना केली जाते, ही विचार करण्याजोगी बाब आहे. स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते. कोणतीही योजना राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो, असे मत वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ १९ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. त्यापैकी घनदाट जंगल केवळ ७-८ टक्के भूभागावर आहे. पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या सध्या आपल्यासमोर ‘आ’वासून उभी आहे. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना पर्यावरणाचे नुकसान दुर्लक्षित करून चालणार नाही. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. मात्र, त्यातील किती झाडांची जोपासना केली जाते, ही विचार करण्याजोगी बाब आहे. सामाजिक, तसेच स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास शासनाच्या योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते.
कोणतीही योजना राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. ग्रामीण भागात काम करताना तेथील नागरिकांच्या गरजा, अनुभव यानुसार कामाचे नियोजन करता येते. वृक्षारोपणाच्या उपक्रमामध्ये स्थानिकांवर झाडांच्या देखभालीची जबाबदारी सोपवल्यास योजना यशस्वी होण्यास मदत होईल. प्लॅस्टिकची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यादृष्टीने शासनाने केलेली प्लॅस्टिकबंदी योग्य आहे, असे वाटते. मात्र, प्लॅस्टिकला ठोस पर्याय निर्माण व्हायला हवेत.
मोहन धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई मार्गक्रमण करीत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षारोपण, मुलींसाठी स्वच्छतागृहे, जलशुद्धीकरण यंत्रे, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आदी माध्यमांतून कार्य सुरू ठेवले आहे. महाराष्ट्रातील शाळा, वनविभागाच्या जागेचा परिसर आणि ‘हरित वारी’ उपक्रमांतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निर्धार वनराई संस्थेच्यावतीने करण्यात आला आहे. संस्थेच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून डॉ. मोहन धारिया वृक्षारोपण व संवर्धन अभियान राज्यभरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली. पिंपळाचे वृक्षारोपण करून या अभियानाला सुरुवात होणार आहे. अभियानाद्वारे कडुनिंब, चिंच, जांभूळ, आपटा, उंबर, वड, पिंपळ अशा देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पुढील तीन वर्षे रोपांचे संवर्धनदेखील नित्यनियमाने केले जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही या अभियानामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभाग घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना कोणत्याही एका किंवा अनेक वृक्षांचे पालकत्व स्वीकारावे लागेल अथवा वृक्षदान करावे लागणार आहे. वनराईतर्फे पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विषमुक्त व सुरक्षित अन्नविषयक माहितीपर दालन, रानभाज्यांची ओळख, शहर शेती, पर्यावरण व शेतीविषयक दुर्मिळ व नामांकित वाचनसाहित्य, मृदा-जलसंवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग दालने असणार आहेत. याद्वारे नागरिकांना कृतिपर विषय समजावले जाऊन त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण करण्याचे कार्य या प्रदर्शनाद्वारे होईल, असा विश्वास धारिया यांनी व्यक्त केला. निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे, तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी प्रदर्शनात रानभाज्यांची ओळख, मृदा-जलसंवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग दालन याद्वारे नागरिकांना कृतिपर विषयातून त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण होणार आहे.

Web Title:  Effective implementation of schemes through public participation - Ravindra Dharia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.