मार्केट यार्डात डमी अडत्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:14 AM2019-02-25T00:14:31+5:302019-02-25T00:14:33+5:30

४ ते ८ डमी अडते : शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळतोय कमी भाव

Dummy links to the market yard | मार्केट यार्डात डमी अडत्यांचा सुळसुळाट

मार्केट यार्डात डमी अडत्यांचा सुळसुळाट

googlenewsNext

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डामधील अडत्यांची संघटना असणाºया अडते असोसिएशनच्या पदाधिकाºयांच्या गाळ्यांवरच डमी अडत्यांची संख्या वाढली आहे. मार्केट यार्डातील फळबाजार आणि तरकारी विभागातील काही अपवाद वगळता अनेक गाळ्यांवर डमी आडत्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. एकाच गाळ्यावर सुमारे ४ ते ८ डमी अडते असल्याचे दिसून येत आहेत. डमी अडत्यांमुळे शेतकºयांच्या शेतमालाला कमी भाव मिळत असून शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परंतु, बाजार समितीकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.


अडते असोसिएशनच्या झालेल्या एका सर्वसाधारण सभेतही दोनच मदतनीस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, संघटनेच्या पदाधिकाºयांच्या गाळ्यावरच डमींची संख्या वाढली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डात फुले, फळे, तरकारी विभागात कृषी उत्पन्न बाजार समितीने एका गाळ्यावर दोन डमी अडत्यांना ‘मदतनीस’या नावाखाली बेकायदा परवानगी दिली आहे.


तसेच मागील वर्षी बाजारातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नवीन नियमावली तयार केली होती.
त्यानुसार बाजाराच्या वेळा, डमी अडत्यांची संख्या आदी नियम घालून दिले. त्यानुसार काही काळ या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच काही डमी अडत्यांवर कारवाई करण्यात आली.


मात्र, गेल्या काही दिवसांपासून डमी अडत्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. मार्केट यार्डात गाळ्यासमोर पंधरा फुटांपर्यंतच शेतमाल विक्रीस परवानगी आहे.
परंतु, डमी अडते गाळ्याच्यासमोर शेतमाल विक्रीसाठी बसतात. त्यामुळे बाजारात शेतमालाची वाहतूक करणाºया वाहनांना वाहतूककोंडीचा त्रास सहन
करावा लागतो, तर डमी अडते गाळेधारक अडतदाराकडून शेतमाल विकत घेऊन चढ्या दराने विकतात. त्यामुळे शेतकºयाच्या शेतमालास कमी
भाव मिळत आहे, असे दिसून येत आहे.

Web Title: Dummy links to the market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.