तरुणांमध्ये दम मारो दम, ई-हुक्का प्यायची वाढतेय क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 02:10 AM2018-11-11T02:10:45+5:302018-11-11T02:11:09+5:30

ई-हुक्का क्रेझ : पानटपऱ्यांवर सहज उपलब्ध; शाळकरी मुलांचा बळी

 Dum Maro Dum, E-Hukka Drink Increasing Craye Of Youth | तरुणांमध्ये दम मारो दम, ई-हुक्का प्यायची वाढतेय क्रेझ

तरुणांमध्ये दम मारो दम, ई-हुक्का प्यायची वाढतेय क्रेझ

Next

माऊली शिंदे 

कल्याणीनगर : राज्य शासनामुळे हुक्कावर बंदी आणली आहे. यामुळे आता खासगी हुक्का पार्ट्यांचे प्रमाणत वाढले आहे. या प्रमाणेच युवकांमध्ये (इलेक्ट्रॉनिक) ई-हक्ुक्याव्दारे दम मारण्याचे प्रमाण वाढले आहे. आॅनलाईन आणि पानटपºयांवर तीनशे ते तेरा हजार रुपयांमध्ये ई हुक्का विक्री होते. पेनसारखी दिसणारी ही वस्तू हुक्का आहे, हे पटकन लक्षात येत नाही. यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि युवक ई हुक्क्याचा वापर सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी सर्रास करू लागले आहेत.

टेरेस रेस्टॉरंट, मंद प्रकाश आणि मोठ्या आवाजातील डीजे संगीतासोबत हुक्का हे चित्र शहरातील अनेक भागामध्ये होते. वेगवगेळ्या इव्हेंटंला हुक्का पार्टीचे आयोजन हॉटेल व्यावसायिक करत होते. हुक्का पिणे हे स्टाईल आणि प्रतिष्ठेचे मानले जात होते. यामुळे हुक्का पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि आयटीतील तरूण हक्का ओढत असायचे. अनेकांना हुक्क्याचे व्यसन जडले होते. हुक्क्याच्या व्यसनामुळे युवकांचे आरोग्य खराब होऊ नये यासाठी राज्य शासनाने हुक्काबंदी लागू केली. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील हुक्का पार्लर बंद झाले आहेत. मात्र, पूर्णत: हुक्क्यावर बंदी आली नाही. हुक्काप्रेमी गुपचूप हुक्का पार्ट्यांचे आयोजन करू लागले आहेत. आॅनलाईन संकेतस्थळावर तसेच पानटपरीवर सहज हुक्क्याचे साहित्य आणि फ्लेवर मिळत आहे. हुक्क्याचे साहित्य घेऊन घरांमध्ये, खासगी जागेत किंवा फार्म हाऊसवर हुक्का पार्टी रंगू लागली आहे. विद्यार्थी पैसे जमा करून पेन ड्राईवसारखा दिसणारा ई हुक्का विकत घेतात. त्यामध्ये फ्लेवर भरून गुपचूप हुक्का ओढतात. पेन ड्राईव आणि पेन सारखा ई हुक्का दिसतो. ई हुक्का लवकर ओळखता येत नाही. त्यामुळे अनेकदा विद्यार्थी कम्पासपेटी किंवा दप्तरामध्ये ई हुक्का सरार्स ठेवतात. पालकांना या हुक्क्याबाबत कळत नाही. एकदा ई हुक्का चार्ज केल्यानंतर तीन ते चार दिवस चालतो. या ई हुक्क्याची क्रेझ विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. राज्यात हुक्क्यावर बंदी असतानाही विद्यार्थी सहजरीत्या हुक्क्याचे व्यसन करू लागले आहेत.
हुक्का सिगरेटपेक्षा जास्त धोकादायक. एक हुक्क्याचे फ्लेवर साधारण ८० मिनिट चालते. जवळपास हजार सिगरेट पिण्यासारख आहे. हुक्क्यातून कार्सिनोजन बाहेर पडते. ज्यामुळे हृदयविकार, फुफ्फुसाचा कॅन्सर यासारखे आजार होतात. हुक्काच्या अ‍ॅपल स्ट्रॉबेरी किवी मिक्स फ्रूटसारख्या फ्लेवरमध्ये फळाचा सिरप नावाला टाकला जातो. या फ्लेवरमध्ये जास्त प्रमाणात निकोटिनयुक्त तंबाखू असते.


ई-हुक्काच्या विक्रीवर निर्बंध आणण्याची गरज
हुक्का पार्लर बंद झाल्यामुळे खासगी हुक्का पार्टीच्या संख्येत वाढ झाली आहे. या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा सहभाग असतो. बालवयामध्ये हुक्का ओढल्याने आरोग्यावर परिणाम होतो. हुक्क्याचे व्यसन पुढे सिगरेट आणि गांज्यामध्ये रुपांतर होते. यामुळे या व्यवसनाला वेळेवर आवरले पाहिजे. पालकांनी मुलांवर लक्ष दिले पाहिजे. ई-हुक्का विक्री करणाºयांवर नार्कोटिक्स आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
- डॉ. अजय दुधाणे, आनंदवन व्यसनमुक्ती व पुनवर्सन केंद्र


खासगी फार्म हाऊसवर हुक्का पार्टीची क्रेझ वाढतेय
गेल्या काही दिवसांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात धरणाच्या कडेला असणाºया फार्म हाऊसमध्ये वाढदिवस, प्रमोशन आणि नियुक्तीची पार्टी करण्याचे प्रमाण वाढले आहे. खासगी फार्म हाऊसवर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही. पोलिसांचा त्रास नसतो. कोणत्याही परवानगीची गरज नसते. यामुळे याठिकाणी रात्रभर नृत्य, दारू आणि हुक्का पार्टी चालते. लोणावळा, मुळशीसारख्या हिल स्टेशनवरील खासगी फार्म हाउसची पार्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सोशल मीडियावर ओळखीच्या व्यक्तींनाच पार्ट्यांचे आंमत्रण दिले जाते. यामुळे पार्टीर्ची माहिती फुटत नाही. या पार्ट्यांमुळे हिल स्टेशनवरील शांतता भंग होऊ लागली आहे.
 

Web Title:  Dum Maro Dum, E-Hukka Drink Increasing Craye Of Youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.