पावसाची हुलकावणी : शेतकरी झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 02:25 AM2018-06-16T02:25:18+5:302018-06-16T02:25:18+5:30

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या राहूबेट (ता. दौंड) परिसरात पावसाने सुरुवातीच्या काळातच हुलकावणी दिल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून काही ठिकाणी ऊसलागवड वेगात चालू आहे. परंतु काही भागात पाण्याअभावी शेतीची कामे रेंगाळली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Due to the rainy season: Farmers will go haywire | पावसाची हुलकावणी : शेतकरी झाले हवालदिल

पावसाची हुलकावणी : शेतकरी झाले हवालदिल

Next

पाठेठाण  - दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या राहूबेट (ता. दौंड) परिसरात पावसाने सुरुवातीच्या काळातच हुलकावणी दिल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून काही ठिकाणी ऊसलागवड वेगात चालू आहे. परंतु काही भागात पाण्याअभावी शेतीची कामे रेंगाळली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
संपूर्ण बागायती पट्टा आणि ऊसपिकाचे आगर म्हणून परिचित असलेल्या राहूबेट परिसरात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात आडसाली उसाची लागवड सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी पाऊस झाला नसल्याने ऊसलागवड, तसेच पेरणीपूर्वी मशागती, पेरणीची कामे खोळंबली असल्याचे दिसून येत आहे.
मुळा-मुठा नदीच्या काठावर असलेल्या मिरवडी, दहिटणे, खामगाव, नांदूर, सहजपूर, उंडवडी, शिंदेनगर, राहू, पिलाणवाडी, देवकरवाडी, मगरवाडी, टेळेवाडी, पिंपळगाव, वाळकी आदी गावात पाण्याची उपलब्धता असल्याने ऊस जोरात आहे.
परंतु भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असल्याने त्यातच पावसाने दडी मारल्याने पाण्यावर अवलंबून असलेल्या पाटेठाण, टाकळी भीमा, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर या ठिकाणी शेतकरी मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडले असल्याने उभी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची जणू धडपड सुरू आहे. पाण्याअभावी कुठलीही पिके घेण्यासाठी धाडस होत नसून चांगला पाऊस झाल्यानंतरच ऊसलागवड, पेरणीच्या कामास सुरुवात करणार असल्याचे परिसरातील शेतकºयांनी सांगितले.

खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी प्रतीक्षेत

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात वारे, कडकडीत ऊन, उष्णता यामुळे पावसाची अपेक्षा लांबली असल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीपासून वंचित राहणार असल्याचे दिसत आहे. जर अशीच उष्णता, कडकडीत ऊन, वारे वाहत गेल्यास याहीवर्षी खरिपाची पेरणी नक्कीच लांबणार असल्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झालेला दिसत आहे.
हुलकावणी दिल्याने येथील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. ७ जूनला वेळेवर पावसाचे आगमन झाले असल्याने येथील शेतकºयांनी बी-बियाणे खरेदी करण्यावर भर दिला होता.
बाजारात चार ते पाच वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी वेळेवर बी-बियाणे खरेदीदाराकडे वळला होता. परंतु तालुक्यात एकदाच जोरदार पाऊस झाल्याने शेतातील ओल पेरणीयोग्य नसल्यामुळे येथील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहावयास
मिळत आहेत.

तालुक्यातील शेतकºयांनी उन्हाळ्यात पेरणीयोग्य मशागत करून शेतातील कामे उरकून ठेवली आहेत.
मृग नक्षत्रात पहिल्याच दिवशी मेघगर्जनेसह जोरदार पावसाने तालुक्याला झोडपून काढले होते. त्यामुळे येथील शेतकºयांना आनंद झाला होता.
हवामान खात्याच्या अंदाजपत्रकात जूनमध्ये मुसळधार व अतिवृष्टीचा इशारा
दिलेला होता.

पावसाचा अंदाज घेऊन शेतकºयाने बी-बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारातील कृषी सेवा केंद्रात झुंबड उडाली होती. परंतु काही दिवसांनी वातावरणात कमालीचा बदल होऊन पुन्हा ऊन, वारे यांचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात बी-बियाणे भरून ठेवलेल्या शेतकºयांना पश्चाताप करावा लागत आहे. या महिन्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यास याहीवर्षी खरिपाची पेरणी लांबणार असल्याचे येथील शेतकºयांनी सांगितले.

Web Title: Due to the rainy season: Farmers will go haywire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.