साहेबांच्या बारामतीत दुष्काळाची दाहकता वाढती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 01:52 AM2018-11-17T01:52:18+5:302018-11-17T01:52:46+5:30

दुष्काळाची झळ वाढतीच : २६ हजार ३१२ ग्रामस्थांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा

Due to the increase in the density of drought in Baramati | साहेबांच्या बारामतीत दुष्काळाची दाहकता वाढती

साहेबांच्या बारामतीत दुष्काळाची दाहकता वाढती

googlenewsNext

बारामती : बारामती तालुक्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसत आहे. सध्या तालुक्यातील ग्रामस्थ अवर्षणग्रस्त स्थितीमुळे हिवाळ्यातच तीव्र उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत. या वर्षी बारामती तालुक्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्केच पाऊस झाला. तहसील कार्यालयाकडे या वर्षी केवळ २२१ मिमी पावसाची नोंद आहे. तालुक्यातील तहानलेल्या २६ हजार ३१२ ग्रामस्थांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या तालुक्यातील १४ गावे १०३ वाड्यावस्त्यांना हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मुर्टी, सोनवडी, सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काºहाटी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, बाबुर्डी, गाडीखेल,वढाणे या गावांसह १०३ वाड्यावस्त्यांना १० टँकरने पाणीपुरवठा सुुरु आहे. पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज १० टँकरच्या ४८ खेपा सुरु आहेत. ६ शासकीय,४ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आहे.

तालुक्यातील १४ गावांमधील ७ हजार २४५ लोकसंख्येला तर १७ हजार १२६ लोकसंख्येचा समावेश आहे. गेल्या ६ वर्षांपासून बारामती तालुक्यात पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना, श्री छत्रपती कारखाना परिसरात ऊसशेती नीरा डावा कालव्याच्या पाण्यामुळे सध्या तरी जगली आहे. मात्र, जिरायती भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर या भागांत सुरु आहेत. त्यातील तरडोली, देऊळगाव रसाळ या गावांना मे महिन्यापासून, मोराळवाडी गावाला जून महिन्यापासून टँकर सुरू आहे.

पिण्याच्या पाण्यापाठोपाठ जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचादेखील गंभीर प्रश्न आहे. चारा, पाणीटंचाईने शेतकºयांच्या दारातील जनावरांची दावण रिकामी होत आहे. उसाच्या ५० मोळ्या ३५०० रुपये दराने विक्री सुरू आहे. पाचट, वाढ्यासह हा उसाचा दर आहे.
४प्रत्यक्षात ३५०० रुपयांमध्ये शेतकºयांना ७०० ते ८०० किलो ऊस मिळत आहे. ऊसविक्री करणाºया व्यावसायिकांनी ऊसविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. हे व्यावसायिक यवत, केडगाव, भांडगाव, नाझरे भागातून ऊस आणुन विक्री करण्यात येत आहे. कारखान्याच्या गाळपासाठी असलेला ऊस जनावरांच्या चाºयासाठी जात असल्याने गळीत हंगामावर त्याचा परीणाम होणार आहे.

जनावरांसाठी मका पिकाची उपलब्धता नसल्याने दूध उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. मका पिकाऐवजी उसाचा खाद्यात समावेश झाल्याने हा परिणाम झाला आहे. माझ्याकडे तीन गायींचे प्रतिदिन ३२ लिटर दूध उत्पादन होते. तेच उत्पादन प्रतिदिन १० लीटरने घटले असल्याचे बारामती तालुक्यातील फोंडवाडा येथील शेतकरी विजय वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Due to the increase in the density of drought in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.