नादुरुस्त रोहित्रांमुळे विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 02:19 AM2018-10-30T02:19:58+5:302018-10-30T02:20:11+5:30

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कोयाळी भानोबाची परिसरात वारंवार विद्युत रोहित्र नादुरुस्त होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.

Due to ill-hearted lightning | नादुरुस्त रोहित्रांमुळे विजेचा लपंडाव

नादुरुस्त रोहित्रांमुळे विजेचा लपंडाव

Next

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कोयाळी भानोबाची परिसरात वारंवार विद्युत रोहित्र नादुरुस्त होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीकडून बदलून दिलेली विद्युत रोहित्रे सुरू होण्यापूर्वीच बंद पडत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून, शेतसिंचनाचा गहन प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

वाकलेले खांब, कुजलेल्या फ्यूजपेट्या आणि हाताच्या अंतरावर लोंबकळणाºया वीजवाहक तारा अशी विदारक परिस्थिती कोयाळीत पाहायला मिळत आहे. त्यातच विद्युत रोहित्रांमध्ये वारंवार बिघाड घडून येत असल्याने शेतकºयांच्या समस्या अधिक वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत तर जणू काही रोहित्र नादुरुस्त होण्याची स्पर्धाच सुरू असल्याचा अनुभव स्थानिक शेतकºयांना येत आहे. कारण यापूर्वी कोयाळी हद्दीतील काचबंगला येथील चार, बिरोबावस्तीच्या दोन, राणूबाईमळा येथील दोन व पोकळेदरा येथील एक अशी एकूण नऊ रोहित्रे नादुरुस्त झाली आहेत. विशेष म्हणजे रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर स्थानिक शेतकरी स्वत: पदरखर्चाने ते बदलून आणत आहेत. मात्र रोहित्र जोडणीनंतर वीजपुरवठा सुरू करण्यापूर्वीच पुन्हा नादुरुस्त होत आहे. परिणामी नवीन रोहित्र जळते कसे? असा संतापजनक सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीची कामे अंतिम टप्प्यात सुरु आहेत. त्यामुळे शेतसिंचनासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असतानाही रोहित्राअभावी लागवडीच्या कामांना दिरंगाई होत आहे. तसेच खेडचा पूर्व भाग हा ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातच आॅक्टोबर हिटच्या कडक उन्हामुळे उसाला अधिक पाणी देण्यातही शेतकºयांची अडचण निर्माण होत आहे. वीज महावितरण कंपनीने शेतकºयांची समस्या लक्षात घेऊन हाताच्या अंतरावर लोंबकळणाºया वीजवाहक तारा, वाकलेले खांब व नादुरुस्त फ्यूजपेट्यांची दुरुस्ती करून देण्याची मागणी सरपंच रेश्मा बनसोडे, उपसरपंच संजय दिघे, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब सरोदे, विकास भिवरे, विठ्ठल कोळेकर, सुभाष बनसोडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कोळेकर आदींनी केली आहे.

फ्यूजपेट्यांची दुरवस्था
कोयाळी-भानोबाची हद्दीतील शिंदेवस्ती, रानमळा, गावठाण, पोकळेदरा, काचबंगला, दिघेवस्ती, बिरोबावस्ती येथे असलेल्या विद्युत रोहित्रांच्या फ्यूजपेट्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे फ्यूज उडाल्यानंतर पुन्हा तो कार्यान्वित करण्यासाठी शेतकºयांना जीव धोक्यात घालून जोडणी करावी लागत आहे.
तसेच हाताच्या अंतरावर लोंबकळणाºया वीजवाहक तारांमुळे काही दिवसांपूर्वी शॉर्टसर्किट होऊन टेंगले वस्तीवर उसाला आग लागली होती.

Web Title: Due to ill-hearted lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.