पावसाअभावी ५ जिल्हे दुष्काळाच्या छायेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 06:10 AM2018-08-05T06:10:54+5:302018-08-05T06:11:03+5:30

निम्मा हंगाम संपल्यानंतरही १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत़ औरंगाबाद, जालना, नंदूरबार, बुलडाणा व सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने परिस्थिती कठीण आहे़

Due to drought in 5 districts due to rain! | पावसाअभावी ५ जिल्हे दुष्काळाच्या छायेत!

पावसाअभावी ५ जिल्हे दुष्काळाच्या छायेत!

पुणे : निम्मा हंगाम संपल्यानंतरही १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत़ औरंगाबाद, जालना, नंदूरबार, बुलडाणा व सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने परिस्थिती कठीण आहे़
कोकणात सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त पाऊस झाला़ ठाणे व पालघर येथे सरासरीपेक्षा ३६ टक्के अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ५ टक्के पाऊस जास्त झाला, पण धुळे, जळगाव, नंदूरबार, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत प्रमाण कमी आहे. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे़ विदर्भात ४ टक्के पाऊस जास्त झाला असला, तरी अमरावती, बुलडाणा, वर्धा या ३ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे़
जुलैमध्ये राज्यात अनेक भागांत पावसामध्ये खंड पडल्याने पिकाला ताण आला आहे़ या पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस पडला नाही, तर अनेक ठिकाणी उगवलेली पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे़
>या जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग
१ जून ते ३ आॅगस्ट या काळातील पाऊस पाहता, नंदूरबार, जालना, बुलडाणा, औरंगाबाद, सांगली जिल्ह्यांमध्ये पाऊस अत्यल्प असून, आतापर्यंतचे प्रमाण लक्षात घेता, तेथे दुष्काळसदृश्य स्थिती दिसत आहे. औरंगाबाद येथे सरासरीपेक्षा ३४ टक्के, जालना येथे ३३ टक्के, नंदूरबार येथे ३० टक्के, बुलडाणा येथे २७ टक्के आणि सांगली येथे २७ टक्के इतका पाऊस कमी झाला आहे़
पाऊस लांबल्यास परिस्थिती चिंताजनक
जिल्ह्यांच्या काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले, तर काही तालुक्यांमध्ये ते कमी असते़ पुढील दोन आठवड्यांत पावसाचे प्रमाण कमी असेल़ सध्याचा खंड वाढल्यास जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ त्या दृष्टीने पिकांच्या पाण्याचे नियोजन आता करण्याची आवश्यकता आहे़ दोन आठवडे कोरडे गेल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते़
- डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

Web Title: Due to drought in 5 districts due to rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.