सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणाने गाठला तळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 03:01 AM2019-03-13T03:01:14+5:302019-03-13T03:03:42+5:30

इंदापूर : ‘‘उजनी धरणातील पाणीपातळी घटत चालली आहे. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे धरणात केवळ २. ०५ टीएमसी उपयुक्त साठा ...

Due to a continuous erosion of the calf | सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणाने गाठला तळ

सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणाने गाठला तळ

Next

इंदापूर : ‘‘उजनी धरणातील पाणीपातळी घटत चालली आहे. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे धरणात केवळ २. ०५ टीएमसी उपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे कृषी संपन्न असलेल्या इंदापूर तालुक्यातील जवळपास ३० गावांतील नळपाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उजनीतील पाण्याची पातळी दिवसोंदिवस खालावत असल्याने बागायती क्षेत्रातील एक लाख एकर शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहे. याचा परिणाम उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील व्यवसायांच्या अर्थकारणावर होणार आहे. येत्या दोन दिवसांत उजनी उणेमध्ये जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, व सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बागायती क्षेत्र याच उजनीमुळे समृद्ध झाला आहे. मात्र, यंदाच्या पावसाने ढील दिल्याने पाण्याची कमतरता भासत आहे. यामुळे धरणा काठावरील नागरिक, शेतकरी आणि विविध व्यावसायिक काळजीत पडले आहेत.

इंदापूर तालुक्यातील एकूण बागायती शेतीचे क्षेत्र हे सुमारे ८० हजार ते १ लाख एकर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस, डाळींब, केळी, द्राक्ष, चिक्कू, आंबा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेतले जात असून, ही गावे आर्थिक बाबतीत सक्षम बनली आहेत. मात्र, धरणाने तळ गाठल्याने हे व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.

यापूर्वी २०१६ च्या दरम्यान उजनीच्या पाण्यात कमालीची घट झाली होती. त्यावेळी देखील पाण्याअभावी येथील शेती आणि व्यवसाय धोक्यात आले होते. त्यानंतर यावर्षी पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे बºयाच गावांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.

उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील जवळपास ३० गावांतील नळपाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याचा पुरवठा दिसून येत नाही. उजनीची पाणीपातळी खालावल्याने अनेक गावांना उजनीमधून पाणीपुरवठा करणारे पंपगृह नदीत कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना व शेतकऱ्यांना पुढील दोन महिन्यांत जलसंकटाला समोर जावे लागण्याची शक्यता आहे.

उजनी नदीपात्रात लाखो शेतकºयांचे कृषिपंप पाण्यामध्ये सोडलेले असायचे. मात्र, सध्या उन्हाळ्याला अवधी असतानाच कृषिपंप पाण्याविना उघडे पडायला लागले आहेत. त्यामुळे पंपांना नवीन जास्तीचे पाईप जोडणी करून नदीपात्रात दूरवर पाईपलाईन करावी लागत आहेत.

यामध्ये इंदापूर तालुक्यातील शहा, तरडगाव, हिंगणगाव, कांदलगाव, माळवाडी, शिरसोडी, पिंपरी, पडस्थळ, आजोती, कालठण, गंगावळण, पळसदेव, तक्रारवाडी, भिगवण, डिकसळ यासह सुमारे ३० गावे पाणलोट क्षेत्रातील असून या व्यतिरिक्त काही गावे सोलापूर जिल्ह्यातील ही आहेत.

आजचा उजनीचा
पाणीसाठा ( सद्य:स्थिती )
एकूण पाणीपातळी ४९१.३२० मीटर, एकूण पाणीसाठा १८६०.९० दलघमी, उपयुक्त पाणीसाठा ५८.०९ दलघमी, टक्केवारी ३.८३ टक्के, एकूण टीएमसी ६५. ७१ असून त्यापैकी केवळ २.०५ टीएमसी उपयुक्त साठा आहे.
विसर्ग ; बोगद्याद्वारे ६९० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे, दहिगाव उपसासिंचनमधून ९० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे, सीना माढा उपसासिंचनमधून २८० क्युसेक्सने, तर कालव्यामधून ३२०० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. त्यामुळे पाणीपातळी अजून खालावण्याची दाट शक्यता आहे.
 

Web Title: Due to a continuous erosion of the calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.