हवामानातील बदलामुळे पुण्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 03:30 PM2018-02-15T15:30:53+5:302018-02-15T15:35:25+5:30

सध्या शहरामध्ये दुपारी कडाक्याचे ऊन आणि सकाळी व रात्री कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे बहुतांश नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला, खसखस, डोकेदुखी अशा आजारांनी घेरले आहे.

Due to climate change, 'Swine Flu' patients increased in Pune | हवामानातील बदलामुळे पुण्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण वाढले

हवामानातील बदलामुळे पुण्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण वाढले

Next

पुणे : गेल्या आठ-दहा दिवसांपासून हवामानामध्ये प्रचंड वेगाने बदल होत असून, सकाळ, संध्याकाळ थंडी व दुपारी कडक ऊन या वातावरणामुळे शहरामध्ये साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी देखील पोषक असल्याने या रुग्णांमध्ये देखील वाढ होत आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन सर्दी-ताप असल्यास वेळीच उपचार घेण्याचा सल्ला महापालिकेच्या आरोग विभागातील अधिकारी यांनी दिला आहे.
सध्या शहरामध्ये दुपारी कडाक्याचे ऊन आणि सकाळी व रात्री कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे बहुतांश नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला, खसखस, डोकेदुखी अशा आजारांनी घेरले आहे. साथीच्या आजारांना हे वातावरण पूरक असल्याने नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव जलद गतीने होण्याचा धोका वाढला आहे. शहरामध्ये गेल्या दीड महिन्यात १ लाख १५ हजार १७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी सुमारे १ हजार ९१० संक्षित रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ््या देण्यात आल्या. तर २०९ रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले. या तपासणीमध्ये ३ रुग्ण पॉझिटीव्ह अढळून आले असून, एक रुग्ण व्हेटीलेटरवर असल्याचे महापालिकेच्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.
    शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये, प्रसूतीगृहांमध्ये दररोजर दररोज दोन ते तीन हजार रुग्णांचे स्क्रीनिंग सुरु असते. यापैकी खूप कमी रुग्ण स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण असल्याचे आढळून येते. परंतु गेल्या काही दिवसांत यामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात सध्याचे हवामानातील बदल लक्षात घेता रुग्णांची ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातीलि तज्ज्ञ व्यक्तींने दिला आहे.

Web Title: Due to climate change, 'Swine Flu' patients increased in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.