व्याजासह पैसे देण्याचे डीएसकेंना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:45 AM2018-05-24T05:45:13+5:302018-05-24T05:47:30+5:30

डीएसकेनी जुलै, २०१७ पासून व्याजाची रक्कम चुकविण्यास सुरुवात केली.

DSKenna order to pay with interest | व्याजासह पैसे देण्याचे डीएसकेंना आदेश

व्याजासह पैसे देण्याचे डीएसकेंना आदेश

Next

पुणे : पुणे : कर्जरोखे कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे १३.४३ टक्के वार्षिक व्याजदरासह परत करण्याचे आदेश कर्जवसुली न्यायाधिकरणाचे (डीआरटी) मुख्याधिकारी दीपक ठक्कर यांनी दिले आहेत. पुण्यातील कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड या कर्जरोखे ट्रस्टी कंपनीस १३१ कोटी ४६ लाख रुपयांची रक्कम देण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. ८ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे. पैसे न मिळाल्यास गहाण मालमत्ता विकण्यास मुभा राहील, असेही न्यायाधिकरणाने निकालात स्पष्ट केले आहे.
डीएसकेनी सेक्युअर्ड नॉन कन्व्हेप्टिबल डिबेंचर्स सप्टेंबर, १९९४मध्ये खुले केले. ते १११.७० कोटी रुपयांचे होते. हे रोखे ३ ते ७ वर्षे मुदतीसाठी साडेबारा ते १३ टक्के व्याजदरानुसार देण्यात येत होते. कर्जरोखेधारकांचे हित जपण्यासाठी, पुण्यातील कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड (पूर्वीची जीडीए ट्रस्टीशिप लिमिटेड) या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. डीएसकेनी जुलै, २०१७ पासून व्याजाची रक्कम चुकविण्यास सुरुवात केली. त्यामुळे ट्रस्टी कंपनीने डीएसके यांना संपूर्ण रक्कम व्याज व दंडाचे व्याजासह देण्याबाबत नोटिसा बजावल्या. पूर्तता न केल्यामुळे ट्रस्टीने डीआरटी, पुणे यांच्याकडे डीएसकेंच्या विरुद्ध, २२ जानेवारी, २०१८ रोजी, पुनर्प्राप्ती प्रमाणपत्र जारी करण्यासाठी आणि गहाण मालमत्तांच्या विक्रीसाठी अर्ज दाखल केला. ट्रस्टीने डीएसकेंच्या विरोधात १३३.४६ कोटी रुपयांच्या दाव्यात मूळ रक्कम, त्यावरील व्याज व दंडाच्या व्याजाचा समावेश होता. डीएसकेंनी रक्कम न दिल्यास अर्जदार ट्रस्टी कंपनीस गहाण मालमत्तेची विक्री करण्याचे स्वातंत्र्य असते. तसेच डीएसके यांना तीन महिन्यांच्या आत गहाण मालमत्ता सोडवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेडच्या यांच्या वतीने रमेश गणबोटे यांनी बाजू मांडली

Web Title: DSKenna order to pay with interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.