Maratha Reservation: मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ते ओबीसी प्रवर्गातून देण्याचा घाट का ? : छगन भुजबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 12:23 PM2018-11-28T12:23:54+5:302018-11-28T12:29:54+5:30

मराठा आरक्षणाला आमचा कधीही विरोध नाही. आणि पवारांचा देखील नाही. मात्र...

Do not oppose to Maratha reservation, but what is the charge of giving OBC category? : Chhagan Bhujbal | Maratha Reservation: मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ते ओबीसी प्रवर्गातून देण्याचा घाट का ? : छगन भुजबळ 

Maratha Reservation: मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ते ओबीसी प्रवर्गातून देण्याचा घाट का ? : छगन भुजबळ 

Next
ठळक मुद्देमुळात ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या ५२ टक्के आरक्षणाचे वर्गीकरण समजून घ्यावे महिला शिक्षणाकरिता अखंड संघर्ष केलेल्या फुले दाम्पत्यांबद्दल आदर आणि प्रेमाची भावना गरजेची

पुणे : मराठा आरक्षणाला आमचा कधीही विरोध नाही. आणि पवारांचा देखील नाही. मात्र, सध्या मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्तून आरक्षण देण्याचा घाट घातला जात आहे ते चुकीचे आहे. मुळात ५२ टक्के आरक्षण जे ओबीसी समाजाला देण्यात आले त्याचे वर्गीकरण समजून घ्यावे लागेल. यात २० टक्के एससी आणि एसटी तसेच ३० टक्के व्हीजेएनटी यांना देण्यात आले आहे. आता उरलेल्या १७ टक्क्यांमध्ये ओबीसी आहेत. अशावेळी मराठ्यांना आरक्षण देताना स्वतंत्रपणे द्यावे. ते ओबीसी मध्ये नको. असे मत समता परिषदेचे अध्यक्ष आणि संस्थापक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. 
भुजबळ म्हणाले, दगडूशेठ गणपतीच्यादारी अथर्वशीर्ष म्हणण्याकरिता गर्दी करणाऱ्या महिलांना रस्त्याच्या पलीकडे महिलांकरिता पहिली शाळा सुरू करणाऱ्या भिडे वाड्यात जावेसे वाटत नाही. तिथे डोके टेकवावेसे वाटत नाही. ज्या फुले दाम्पत्यांनी महिला शिक्षणाकरिता अखंड संघर्ष केला त्यांच्या बद्दल आदर आणि प्रेमाची भावना मनात बाळगणे गरजेचे आहे. 

Web Title: Do not oppose to Maratha reservation, but what is the charge of giving OBC category? : Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.