आळेफाटा येथे अपघातात ढोलताशा पथकाचा वादक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 04:05 PM2018-09-15T16:05:36+5:302018-09-15T17:11:21+5:30

शनिवारी सकाळी ढोल ताशा घेऊन जाणारे वाहन व दुध टँकर यांच्या झालेल्या अपघातात एक जण ठार व १२ जण जखमी झाल्याची घटना कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा परिसरात घडली.

dholpathak player's death in an accident at Alephata | आळेफाटा येथे अपघातात ढोलताशा पथकाचा वादक ठार

आळेफाटा येथे अपघातात ढोलताशा पथकाचा वादक ठार

googlenewsNext
ठळक मुद्देअपघातानंतर जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल

आळेफाटा : ढोल ताशा घेऊन जाणारे वाहन व दुध टँकर यांच्या झालेल्या अपघातात ढोल ताशा पथकाचा एक जण ठार व १२ जण जखमी झाल्याची घटना कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा परिसरात शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
संजय रखमाजी त्रिभुवन (वय ५०)  असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामपुर (अहमदनगर) येथील पूनम ढोल पार्टीचे पथक मुंबई येथील गणेश उत्सव कार्यक्रमात वाजवून टेम्पोतून (क्रमांक एमएच १४, डीएम. २८२९) कल्याण नगर महामार्गाने परतत असताना आळेफाट्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वडगाव आनंद परिसरात समोरून येणाऱ्या दुधाचा टॅकर (एमएच १४ बीजे ६८९६ ) यांची समोरासमोर धडक झाली.
दरम्यान, ढोल ताशा पथकातील शाहरूख रशिद शेख (वय २३), ख्वाजा रशिद शेख (वय २५), विशाल दिलीप थोरात (वय २२), सागर कचरू शेलार (वय २४), राजू संजय साबळे (वय १९), संजू पुजा भालेराव (वय ३१), किरण हनुमंत ननावरे (वय २८), उमेश चव्हाण (वय ३०), अजय धिवर (वय २६), सचिन बोरकर (वय २०), नरेंद्र चव्हाण (वय २७), विष्णू शेलार (वय ३०) (सर्व रा. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) हे जखमी झाले. यातील गंभीर जखमी शेख बंधु व किरण ननावरे यांना पुढील उपचारासाठी संगमनेर व नगर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर ग्रामस्थ व आळेफाटा पोलिसांनी जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल केले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 
  

Web Title: dholpathak player's death in an accident at Alephata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.