हिंदूंच्या संघटनासाठी धर्मजागृती सभा -पराग गोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 02:47 AM2017-11-27T02:47:44+5:302017-11-27T02:47:53+5:30

हिंदू संस्कृतीवर आक्रमण होत आहे. दहशतवाद वाढला असून, पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाने येथील परंपरांना छेद देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अशा परिस्थितीत हिंदू परंपरा आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. परंपरा आणि संस्कृती याची सांगड घालत हिंदूराष्टÑ निर्मितीच्या उद्देशाने हिंदू जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटनांच्या माध्यमातून धर्मसभांचे आयोजन केले जाते. धर्मसभांच्या आयोजनामागील हा उद्देश समितीचे समन्वयक पराग गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

 Dharmajagruti Sabha for Hindu organizations - Parag Gokhale | हिंदूंच्या संघटनासाठी धर्मजागृती सभा -पराग गोखले

हिंदूंच्या संघटनासाठी धर्मजागृती सभा -पराग गोखले

Next


हिंदूंचे संघटन हा उद्देश ठेवून हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संस्थांच्या माध्यमातून हिंदू धर्मजागृती सभा घेण्यात येतात. जातिभेदाच्या पलीकडे हिंदू म्हणून सर्वांना एकत्र आणण्याचे मोलाचे काम धर्मजागृती सभांच्या माध्यमातून होते. गेल्या १० वर्षांत देशाच्या विविध भागांत १५००हून अधिक धर्मसभा घेण्यात आल्या. पुण्यात शंभरहून अधिक धर्मसभा झाल्या असून, त्यामुळे व्यापक जनजागृतीचा उद्देश सफल झाला आहे.
परंपरा आणि संस्कृतीला भारतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत संस्कृतीवर आक्रमण होत आहे. संस्कृतीहननाच्या घटना वारंवार घडत आहेत. हिंसाचार, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यातच सांंस्कृतिक दहशतवाद वाढू लागला आहे. हिंदुत्वावर हे आघात होत आहेत. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच हिंदूंचे खच्चीकरण होत आहे.
जात-पात, पक्ष, संप्रदाय याचा अभिनिवेश बाजूला ठेवून हिंदूंचे संघटन करणे, त्यांच्यामध्ये धर्मजागृती करणे या उद्देशाने आयोजित केल्या जाणाºया धर्मसभांना नागरिकांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. समाजातील विशिष्ट वर्गाला लक्ष्य केले जात आहे. इतिहासाची मोडतोड, राष्टÑपुरुषांचे विकृतीकरण केले जात आहे. त्यासाठी अलीकडच्या काळात चित्रपट या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. वेद, उपनिषदे यांबद्दल विखारी प्रचार करणारी यंत्रणा या देशात काहींनी कार्यान्वित केली आहे. अशा वेळी समाजापुढे, नव्या पिढीपुढे आदर्श काय ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धर्मजागृती सभांमध्ये देवघराची मांडणी कशी असावी, धर्मशास्त्रानुसार नैवेद्य कसा करावा, पारंपरिक
विधी कसे करावेत, या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले
जाते. धर्मसभांमध्ये आध्यात्मिक विषयावरील ग्रंथ उपलब्ध करून
दिले जातात. धर्मसभेच्या ठिकाणी मोठ्या स्वरूपातील ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. एवढेच नव्हे, तर क्रांतिकारकांचे चित्रप्रदर्शन भरविण्यात येते. काश्मिरी विस्थापित हिंदू आणि बांगलादेशातील हिंदूंची स्थिती, या विषयी छायाचित्र प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असते. धर्मजागृती सभांचे हे खास वैशिष्ट्य असते. सभेत केवळ हिंदू संस्कृती आणि परंपरांविषयीचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन एवढाच हेतू नसतो, तर देशाभिमान आणि राष्टÑाप्रति आपुलकीची भावना रुजविण्याचे काम या धर्मजागृती सभांमधून केले जाते, हे आवर्जून नमूद करावे वाटते.
पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण होईल, असे कार्यक्रम आपल्या येथे आयोजित केले जात आहेत.
या कार्यक्रमांच्या माध्यमातून नवतरुणांना व्यसनाधीनतेकडे ओढले जात आहे. गोव्यात असाच पाश्चात्त्य धर्तीवरील तरुणाईला आकर्षित करणारा एक फेस्टिव्हल झाला. त्यात अनेक तरुण-तरुणी सहभागी झाल्या होत्या. अंमली पदार्थ विक्री करणाºया एका बड्या व्यापाºयाचा यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. कोणतीही शासकीय परवानगी न घेता, राजरोसपणे असे कार्यक्रम घेतले गेले. सुमारे दोन कोटींचा शासनाचा कर बुडविल्याचे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने आयोजकांना शासकीय कर भरण्याचा आदेश दिला. आयोजकांनी गोव्यानंतर पाश्चात्त्यांच्या धर्तीवरील कार्यक्रम घेण्यासाठी पुणे हे ठिकाण निवडले. त्याला कडाडून विरोध झाला असतानाही कार्यक्रम झाला.
यंदाही असा कार्यक्रम पुण्यातच आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, सभेच्या माध्यमातून त्यास कडाडून विरोध करण्यात आला. हिंदू संस्कृतीवरील आक्रमण, आघात थोपविण्यासाठी नागरिकांमध्ये धर्मजागृती असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यापक जनजागृतीला अधिक महत्त्व दिले गेले आहे.
महाराष्टÑ, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आदी ठिकाणी वेळोवेळी धर्मसभा घेऊन प्रबोधनाचे काम समितीने केले आहे.

Web Title:  Dharmajagruti Sabha for Hindu organizations - Parag Gokhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.