पुण्यात रसाळ फळांना मागणी ; दरही वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:27 AM2019-03-11T11:27:54+5:302019-03-11T11:28:14+5:30

कलिंगड, खरबूज, डाळींब, मोसंबी आणि लिंबांना उन्हामुळे मागणी वाढल्यामुळे दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Demand of juicy fruits in Pune; Rates also increased | पुण्यात रसाळ फळांना मागणी ; दरही वाढले 

पुण्यात रसाळ फळांना मागणी ; दरही वाढले 

Next
ठळक मुद्देउन्हामुळे फुलांची आवक झाली कमी

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी बाजारात कलिंगड, खरबूज, डाळींब, मोसंबी आणि लिंबांना उन्हामुळे मागणी वाढल्यामुळे दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पपईची मागणी घटल्याने दर दहा टक्क्यांनी घट झाली आहे़ तर सफरचंद, चिक्कू, अननस, पेरू, स्ट्रॉबेरी, बोरे, संत्रा आणि द्राक्षांचे दर मात्र स्थिर होते़  स्ट्रॉबेरीचीही आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. तर लिंबांना ज्युस विक्रेते आणि रसवंतीगृहांकडून मागणी वाढली असल्यामुळे दरामध्ये वाढ झाल्याची माहिती व्यापारी रोहन जाधव यांनी दिली़ बाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, मोसंबी ५५ ते ६० टन, संत्री ४० टन, डाळिंब १५० टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, चिक्कू दोन हजार डाग, पेरू चारशे क्रेट्स, कलिंगड ३० ते ३५ टेम्पो, खरबूज १५ ते २० टेम्पो, सफरचंद दीड ते २ हजार पेटी, बोरे १०० गोणी, स्ट्रॉबेरी तीन ते चार टन आणि द्राक्षांची ५० ते ५५ टन आवक झाली.
----------------------------------
उन्हामुळे फुलांची आवक झाली कमी
मार्केटयार्डातील फुलबाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांची आवक घटली असून मागणीही घटली आहे. त्यामुळे गुलछडी वगळता सर्वच फुलांचे भाव दहा ते वीस टक्क्यांनी  घटले आहेत़ गेल्या आठवड्यात महाशिवरात्री होती त्यामुळे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी होती़ मात्र त्यानंतर मागणी घटली आहे़ फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-३०, गुलछडी : ८० ते १२०, बिजली : ५-२०, कापरी : १०-३०, कागडा : १००-२००, मोगरा : ३००-६००, आॅस्टर : ५-१५, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिली बंडल : ५-१०, जबेरार् : १०-४०, कार्नेशियन : ४०-६०.
-------------------------

Web Title: Demand of juicy fruits in Pune; Rates also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.