इंदापूरच्या तहसीलदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:24 AM2019-02-22T00:24:22+5:302019-02-22T00:24:59+5:30

अवैध वाळूचोरीच्या दंडाची कागदपत्रे जाळल्याचा आरोप : मागणीदार मागासवर्गीय असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ

The demand for filing cases against the Tehsildars of Indapur | इंदापूरच्या तहसीलदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

इंदापूरच्या तहसीलदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

Next

इंदापूर : अनाधिकृतरीत्या, विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्याा वाहनासंदर्भातील मूळ कागदपत्रे नष्ट करून बनावट फायली बनवून लाखो रुपये भ्रष्ट व गैरमार्गाने मिळविणाºया इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना तत्काळ निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी महसूल व वन विभाग मंत्रालय सचिव यांच्याकडे इंदापूरचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर मखरे यांनी केली आहे.

याबाबत रत्नाकर मखरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, याबाबत मंत्रालयातील सचिव यांना ( दि. २८ जानेवारी २०१९ ) रोजी रजिस्टर पोस्टाने तक्रार अर्ज, पुराव्याच्या कागदपत्रासह पाठविल्यामुळे चिडून जाऊन इंदापूरचे तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी यांनी वरीष्ठांचे आदेश डावलून श्री. हर्षल चित्तरंजन पाटील तर्फे कुलमुखत्यार चित्तरंजन वामनराव पाटील यांना गौणखनिज संपत्तीच्या बनावट कागदपत्रे, शिक्के आदी प्रकरणात वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न (दि.३० जानेवारी २०१९) रोजी खनिकर्म/ कावि/२३५०/ २०१८ चे न्याय निर्णयान्वये केला आहे. असा आरोप रत्नाकरजी मखरे यांनी केला आहे.
याबाबत मखरे यांनी पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांनानिवेदने दिले.

‘अजब कारवाई’ वाळू चोरणाराच आरोपी झाला पंच..!
तहसीलदारांनी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच ४२-एव्ही ०८९३) हा ४ आॅक्टोबर २०१८ रोजी रात्री १.३० वाजता कलठण ता. इंदापूर येथे पकडला होता. त्याच्या पंचनामा कागदावर आरोपी म्हणून ट्रॅक्टर मालक महेश मारकड हे होते. मात्र पंचनाम्यामध्ये खाली पंच म्हणून देखील महेश मारकड यांचीच सही ? व ट्रक्टर मोकळा आहे असे दाखवून ट्रॅक्टर सोडून दिले.असे कागदपत्रे माहिती अधिकारात देण्यात आले आहेत. ‘राव अजब कारवाई’ वाळू चोरणाराच कसा झाला पंच..! अशी चर्चा इंदापूरमध्ये रंगली आहे.

माझ्या वरिष्ठांनी मला जे आदेश दिले आहेत, त्याचे मी तंतोतंत पालन केले असून, त्यानुसार कार्यवाही केली आहे. चार वर्षांपासून सर्व कारवाई चालू आहे. मात्र, सध्या काही प्रकरणे निकाली निघत आहेत. काहींना हा निर्णय मान्य नसेल, तर त्यांनी न्यायालयात कायदेशीर दाद मागावी. - सोनाली मेटकरी, तहसीलदार, इंदापूर

तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी वाळू व गौणखनिज संदर्भातील सर्व कागदपत्रे माहिती अधिकारात बनावट दिले असून, मुळ कागदपत्रे जाळून टाकले आहेत. मी केवळ मागासवर्गीय असल्याने मला माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून, तहसिलदार यांनी शासकीय जमिनी खाजगी लोकांच्या नावे केले आहेत. त्यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत कारवाई कारण्यासाठी जिल्हाधिकारी व आयुक्तालय यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याला प्रतिसाद मिळाला नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
- रत्नाकर मखरे, माजी नगराध्यक्ष इंदापूर नगरपालिका

Web Title: The demand for filing cases against the Tehsildars of Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे