डेक्कन बसस्थानक परिसर मुली, महिलांसाठी डोकेदुखी; टवाळखोरांना आवर घालण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:41 PM2017-12-13T12:41:55+5:302017-12-13T12:47:55+5:30

शहराच्या विविध भागांतून येणारे अनेक विद्यार्थी ‘पीएमपी’च्या डेक्कन जिमखाना बसस्थानकातून बसने ये-जा करीत असतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी नेहमीच गर्दी असते. याचाच फायदा घेत काही टवाळखोर मुले महिला व मुलींना त्रास देतात. 

Deccan bus stop premises girls, headache for women; need to patrol | डेक्कन बसस्थानक परिसर मुली, महिलांसाठी डोकेदुखी; टवाळखोरांना आवर घालण्याची गरज

डेक्कन बसस्थानक परिसर मुली, महिलांसाठी डोकेदुखी; टवाळखोरांना आवर घालण्याची गरज

Next
ठळक मुद्देसकाळ-सायंकाळी नेहमीच गर्दी, याचाच फायदा घेत टवाळखोर मुले महिला व मुलींना देतात त्रास टवाळखोर मुलांमध्ये शहरातील नामांकित शाळा-महाविद्यालयांतील मुलांचाही सहभाग

लोकमत पाहणी

टीम लोकमत : राजानंद मोरे, वृषाली केदार, गायत्री श्रीगोंदेकर, राहुल दळवी, रजत खामकर 

पुणे : नेहमीच प्रवाशांची वर्दळ असलेल्या डेक्कन जिमखाना बसस्थानकांमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी, महिला प्रवाशांना टवाळखोर मुलांचा त्रास सहन करावा लागत आहे, तसेच अनेकदा ज्येष्ठ नागरिकही त्याला बळी पडत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले. शहरातील इतर बसस्थानके तसेच बसमध्येही असा त्रास असल्याचे पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘पीएमपी’च्या डेक्कन जिमखाना बसस्थानकावर प्रवाशांची सातत्याने मोठी गर्दी असते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने, तसेच अनेक भागांत या स्थानकातून बसेसची ये-जा असल्याने प्रवासी या स्थानकाला पसंती देतात. या स्थानकालगत असलेल्या डेक्कन, शिवाजीनगर या भागात शाळा-महाविद्यालये आहेत. 
शहराच्या विविध भागांतून येणारे अनेक विद्यार्थी या स्थानकातून बसने ये-जा करीत असतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी नेहमीच गर्दी असते. याचाच फायदा घेत काही टवाळखोर मुले महिला व मुलींना त्रास देतात. 
डेक्कन बसस्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, की टवाळखोर मुलांमध्ये शहरातील नामांकित शाळा-महाविद्यालयांतील मुलांचाही सहभाग आहे. याबाबत शाळा प्रशासनाकडे तक्रार करूनही काही बदल झालेला नाही. तसेच मुली आमच्याकडे तक्रार करतात, तेव्हा आम्ही १०० क्रमांकावर संपर्क साधून मदत मागतो.  

अनेक ठिकाणी हाच त्रास
केवळ डेक्कनच नव्हे, तर शहरात अनेक ठिकाणी मुलींना अशा त्रासाला सामोरे जावे लागते. पीएमपी प्रशासनाकडून टवाळखोर मुलांवर वचक बसविण्यासाठी शहरांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी अनेकदा तक्रार दिली आहे. पूलगेट, डेक्कन जिमखाना, येरवडा, कर्वे रस्ता यांसह विविध भागांतून अशा तक्रारी येत असतात. त्यानुसार स्थानिक पोलिसांकडे तक्रारी केल्या जातात. पोलिसांकडून गर्दीच्या वेळी गस्त घातली जात असली तर त्यानंतर या मुलांचा त्रास सुरूच असतो, असे पीएमपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरवाजातच करतात गर्दी
ठराविक बसस्थानकांमध्ये मुले बसमध्ये चढल्यानंतर दरवाजातच गर्दी करतात. तिथे उभे राहून शेरेबाजी करणे, इतर प्रवाशांची अडवणूक केली जाते. पुढील स्थानक आल्यानंतर मुली-महिलांना आत चढतानाही त्रास होतो. वाहकाकडून अनेकदा त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, त्यांच्याकडून दाद दिली जात नाही. पीएमपी कर्मचाऱ्यांसोबतही ते वाद घालतात.

Web Title: Deccan bus stop premises girls, headache for women; need to patrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे