जुन्नर येथे किरकोळ भांडणातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 04:33 PM2018-06-01T16:33:08+5:302018-06-01T16:33:08+5:30

तरुणाला क्षुल्लक कारणाने तरुणाला करण्यात आलेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.

The death of a young man in hitten due to quarrel at Junnar | जुन्नर येथे किरकोळ भांडणातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

जुन्नर येथे किरकोळ भांडणातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

googlenewsNext

ओतूर: नगर कल्याण महामार्गावरील वाटखळे (ता. जुन्नर) येथे किरकोळ भांडणाच्या कारणावरून तरुणाला करण्यात आलेल्या जबर मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. खून करण्यात आला आहे. अजय विश्वास घोलप वय २८ वर्षे रा.वाटखळ (ता.जुन्नर) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ओतूर पोलीस ठाण्यात मयत व्यक्तीच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्याद दाखल करून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ भांडणातून ही घटना घडली आहे. नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत अजयला जबर मार लागला. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, अजयचा यात मृत्यू झाला. ओतूर पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे. 

Web Title: The death of a young man in hitten due to quarrel at Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.