रूग्णालयातून पळून गेलेल्या रूग्णाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:29 PM2018-05-10T18:29:29+5:302018-05-10T18:29:29+5:30

दारूचे व्यसन सोडल्याने शारीरिक त्रास जाणवू लागल्याने पिंपरीच्या यशवंतराव स्मृती रूग्णालयात (वायसीएम) दाखल केलेला रूग्ण तेथून पळून गेला होता. या बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह रूग्णालय आवारात आढळून आला.

dead body was found of patient who had escaped from hospital | रूग्णालयातून पळून गेलेल्या रूग्णाचा मृतदेह आढळला

रूग्णालयातून पळून गेलेल्या रूग्णाचा मृतदेह आढळला

Next
ठळक मुद्देरुग्णालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नातेवाईकांचा गोंधळ

पिंपरी : मद्याचे व्यसन सोडल्याने शारीरिक त्रास जाणवू लागल्याने पिंपरीच्या यशवंतराव स्मृती रूग्णालयात (वायसीएम) दाखल केलेला रूग्ण तेथून पळून गेला होता. या बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह रूग्णालय आवारात आढळून आला. मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच रुग्णालयात मृत व्यक्तीचे नातेवाईक जमा झाले. मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे रूग्णालयात तणावाचे वातावरण होते. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन देवराम सावंत (वय ४२, रा. भोसरी चक्रपाणी वसाहत)असे मृत रुग्णाचे नाव आहे. त्याला मंगळवारी (दि.८ मे )  रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गेल्या पाच सहा वर्षांपासून दारूचे व्यसन असलेल्या मोहन यांनी महिनाभरापासून दारू पिणे सोडले होते. कालांतराने त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना मंगळवारी ८ मे रोजी वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र,९ मे रोजी रात्री हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत गायब झाला. रूग्णालयातून रूग्ण गायब झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी रूग्णालयातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यास सांगितले. त्यानुसार नातेवाईक जवळच्या संत तुकारामनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यास गेले. त्याचवेळी एका रूग्णाचा मृतदेह रूग्णालय आवारात आढळून आल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोलीस चौकीतून नातेवाईकांनी पुन्हा रूग्णालयाकडे धाव घेतली. रूग्णालय आवारात येवून पाहिले असता पळून गेलेल्या सावंत यांचा मृतदेहाची ओळख पटली.ओळख पटल्यावर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे रूग्णालयात तणावाचे वातावरण होते.
सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, नातेवाईकांनी संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 
रूग्णालयातून रूग्ण पळून जातो कसा? येथील सुरक्षा रक्षक करतात तरी काय? रूग्णालय परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे प्रकार का कैद होत नाहीत. रूग्णांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकांना रूग्णालयात सोडण्यास मज्जाव करून कर्तव्यदक्ष असल्याचे भासविणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या समोर रूग्ण पळून जातात. हे लक्षात कसे येत नाही. अशा अनेक प्रश्नांचा भडिमार करून मोहन सावंत यांच्या नातेवाईकांनी रूग्णालय व्यवस्थापनास धारेवर धरले. 

Web Title: dead body was found of patient who had escaped from hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.