81 लाख रुपयांचे साेने लपवून घेऊन चाललेल्या महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 09:13 PM2019-02-07T21:13:20+5:302019-02-07T21:15:48+5:30

पुणे विमानतळावर एअर इडियाच्या विमानाने आलेल्या महिलेकडे कस्टम विभागाला तब्बल 81 लाख रुपयांचे साेने अढळून आले.

custom officer arrest women carrying gold worth rupees at pune airport | 81 लाख रुपयांचे साेने लपवून घेऊन चाललेल्या महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात

81 लाख रुपयांचे साेने लपवून घेऊन चाललेल्या महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात

पुणे : पुणे विमानतळावर एअर इडियाच्या विमानाने आलेल्या महिलेकडे कस्टम विभागाला तब्बल 81 लाख रुपयांचे साेने अढळून आले. अधिकाऱ्यांनी महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याकडे अधिक तपास करण्यात येत आहे. 

गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाने पुणे विमानतळावर उतरलेल्या बेबी शिवाजी वाघ या महिलेची कस्टमच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. या झडतीमध्ये महिलेच्या कमरेला चार प्लॅस्टिकच्या बॅग अडकवल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पेस्टच्या स्वरुपात 2 किलाे चारशे 22 ग्रॅम  इतके साेने तस्करीसाठी नेत असल्याचे आढळून आले. या साेन्याची किंमत 81 लाख 75 हजार 32 इतकी आहे. प्लॅस्टिकच्या बॅग या महिलेने कमरेला बेल्टच्या स्वरुपात लावल्या हाेत्या. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी महिलेवर गुन्हा दाखल केला असून तिने हे साेने काेठून आणले, काेणाला विकण्यात येणार हाेते याबाबत चाैकशी करण्यात येत आहे. 

Web Title: custom officer arrest women carrying gold worth rupees at pune airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.