मावडीतही कांदा आणि लसुणाच्या शेतात अफुची लागवड; ७६ हजारांची ३८ किलो अफुची बोंडे जप्त

By विवेक भुसे | Published: March 3, 2024 05:47 PM2024-03-03T17:47:44+5:302024-03-03T17:47:59+5:30

जेजुरी पोलिस ठाण्याच्या पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत मावडी मध्ये शेतात विनापरवाना अफुची लागवड करुन उत्पादन घेतले जात असल्याची माहिती मिळाली

Cultivation of opium in onion and garlic fields in Mavadi too 76 thousand 38 kg of opium seeds seized | मावडीतही कांदा आणि लसुणाच्या शेतात अफुची लागवड; ७६ हजारांची ३८ किलो अफुची बोंडे जप्त

मावडीतही कांदा आणि लसुणाच्या शेतात अफुची लागवड; ७६ हजारांची ३८ किलो अफुची बोंडे जप्त

पुणे : कुरकुंभमध्ये ड्रग्जचा कारखान्यातून देशापरदेशात एम डी हे पाठविले जात असल्याचे उघडकीस आले होते. त्याचवेळी सासवडजवळील गावात अफुची शेती केली जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता पुरंदरमधील मावडी या गावातही कांदा आणि लसुणाच्या शेतात अफुची लागवड केली जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

किरण कुंडलीक जगताप (वय ४०) व रोहिदास चांगदेव जगताप (वय ५५, रा. कोडीत, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामीण पोलिस दलाचा कार्यभर स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री सेवन करणार्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. जेजुरी पोलिस ठाण्याच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मावडी मध्ये शेतात विनापरवाना अफुची लागवड करुन उत्पादन घेतले जाते अशी बातमी मिळाली. त्यानुसार जेजुरी व भोर पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकारी मावडी गावातील जगताप मळ्यातील कवठीचा मळा येथे गेले. तेथील दोन वेगवेगळ्या शेतात जावून पाहणी केली असता तेथे बेकायदेशीर विनापरवाना अफुची लागवड केलेली दिसून येऊ नये, म्हणून कांदा व लसुण पिकाची लागवड करण्यात आली होती. ७६ हजार ५६० रुपयांचे ३८.२८ किलो वजनाची अफुची झाडे जप्त करण्यात आली आहे.

पाच दिवसांपूर्वी पुरंदर तालुक्यातील कोडीत गावात स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना अफुची लागवड केलेल्या दोघांवर कारवाई केली होती. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी श्रीकांत पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब पवार, जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, नामदेव तारडे, पोलिस अंमलदार विठ्ठल कदम, शुभम भोसले, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, भानुदास सरक यांनही ही कामगिरी केली.

Web Title: Cultivation of opium in onion and garlic fields in Mavadi too 76 thousand 38 kg of opium seeds seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.