भाजपाकडून आचारसंहितेचा भंग: परवानगी न घेता बैठकीचे आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 04:08 PM2019-03-31T16:08:08+5:302019-03-31T16:16:33+5:30

निवडणुकीत किमान  ४८ तास अगोदर प्रचार रॅली,बैठका,सभा, कोपरा सभा आंदीसाठी परवानगी मागणे गरजेचे आहे.

cross to Code of Conduct by the BJP: without permission took meeting | भाजपाकडून आचारसंहितेचा भंग: परवानगी न घेता बैठकीचे आयोजन 

भाजपाकडून आचारसंहितेचा भंग: परवानगी न घेता बैठकीचे आयोजन 

Next

पुणे ( चंदननगर) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगावशेरी येथील नगर रोडवर लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाजपा व शिवसेना पक्षाची बैठक बुधवारी(दि.२७)  आयोजित करण्यात आली होती .या बैठकीला कायदेशीर कोणतीही परवानगी न घेता आयोजन करून भाजपाकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे . 
नगररस्त्यावर इनॉर्बिट मॉलशेजारी शिवांजली मंगल कार्यालयात भाजप उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला चंदननगर पोलिस ठाण्याकडून कोणतीही परवानगी न घेता आयोजित केली होती. या बैठकीला स्पीकर लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून फिर्यादी ए.पी.ओव्हाळ राज्यकर अधिकारी विक्रीकर भवन यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवार पासून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ येथे निवडणूक कार्यालय येरवडा पुणे भरारी पथकातील प्रमुख नेमणूक करण्यात आलेले आहे. यांनी आरोपी  भारतीय जनता पार्टीचे वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष संतोष लक्ष्मण राजगुरू यांच्या विरोधात आदर्श  आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
-----
किमान ४८ तास अगोदर परवानगी मागावी....
निवडणुकीत किमान  ४८ तास अगोदर प्रचार रॅली,बैठका,सभा, कोपरा सभा आंदीसाठी परवानगी मागणे गरजेचे असुन ,निवडणुकीत सर्वांची बाजू, ठिकाण पाहुणच परवानगी देण्यात येते ....
-----
सदर बैठकीला भाजपचे वडगावशेरी अध्यक्ष संतोष राजगुरू यांनी परवानगी मागितली होती मात्र ही परवानगी परवानगी आचारसंहिते मध्ये किमान २४  ते १८ तास अगोदर मागणे गरजेचे असून ती उशिरा मागितल्यामुळे परवानगी देऊ शकलो नाहीत व त्यांच्या वरती कलम १८८ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
-कृष्णा इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे 
--------
सदर बैठकीला परवानगी नाकारण्यात आल्यामुळे आम्ही या बैठक आयोजकावर  आदर्श आचारसहिंता भंग केल्याप्रकरणी मी स्वत: चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
- एन.पी.ओव्हाळ , भरारी पथक प्रमुख,वडगावशेरी विधानसभा
-----

Web Title: cross to Code of Conduct by the BJP: without permission took meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.