पत्नीला पेटविणाऱ्या पतीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:20 AM2019-02-08T00:20:14+5:302019-02-08T00:20:25+5:30

पत्नीला पेटवून देऊन मारुन टाकण्याचा प्रयत्न करणाºया आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील अतिरीक्त सत्र न्यायाधीश एन बी शिंदे यांनी ठोठावली.

Crime News Pune | पत्नीला पेटविणाऱ्या पतीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

पत्नीला पेटविणाऱ्या पतीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

googlenewsNext

बारामती : पत्नीला पेटवून देऊन मारुन टाकण्याचा प्रयत्न करणाºया आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील अतिरीक्त सत्र न्यायाधीश एन बी शिंदे यांनी ठोठावली. अमोल लक्ष्मण अहिवळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ५ हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी पत्नीचा अमानुष छळ केल्याबद्दल तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड न भरल्यास पुन्हा सहा महिने सक्तमजुरी ठोठावण्यात आली आहे.
या घटनेची हकीकत अशी की, दौंड येथील (होलार नगर,जिल्हा पुणे) येथील अमोल लक्ष्मण अहिवळे याचे लग्न इंदापूर येथील रूपाली हिच्यासोबत झाले होते. लग्नानंतर आरोपी अमोल याने वेळोवेळी पत्नीचा अमानुषपणे शारीरिक व मानसिक छळ केला त्याला मद्याचे व्यसन होते.तिला तो वेळोवळी मारहाण करीत असे. मारहाणीत तिचा डोळा निकामी झाला होता. तसेच तिचे सासू सासरे वारंवार पैशाची तसेच गोदरेजचे कपाट, टीव्ही, अशा वस्तूंचा मागण्या करीत असत. या वस्तू न आणल्यास तिला मारहाण केली जात असे.

Web Title: Crime News Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.