Corona Vaccination: पुण्यात 'मिशन १०० डेज'; लसीकरणाची मोहीम अधिक जलदगतीने करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 05:44 PM2021-04-02T17:44:24+5:302021-04-02T17:49:52+5:30

Corona vaccination in pune : केंद्राकडून पुण्याला नुकताच ३ लाख २५ हजार ७८० लसींचा साठा मिळाला आहे.

Corona Vaccination: 'Mission 100 Days' in Pune; Vaccination campaign will be done more quickly | Corona Vaccination: पुण्यात 'मिशन १०० डेज'; लसीकरणाची मोहीम अधिक जलदगतीने करणार

Corona Vaccination: पुण्यात 'मिशन १०० डेज'; लसीकरणाची मोहीम अधिक जलदगतीने करणार

Next

पुणे : पुणे,पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मात्र ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचसोबत पुण्यात सर्वात जास्त प्रमाणावर लसीकरण सुरु आहे. शंभर दिवसात लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन १०० डेज”ही मोहीम हाती घेणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

पुण्यात शुक्रवारी(दि.२)पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली व लोकप्रतिनिधी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काही नवीन निर्बंध घोषित केले. राव म्हणाले,पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर मध्ये कोरोनाबाधितांची संख्या खूप वेगाने वाढत आहे.  त्यामुळे ते रुग्ण पुण्यात यायलला सुरुवात होईल. तर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येईल. म्हणूनच पुण्यातील लसीकरणाची मोहीम यापुढे आणखी वेगवान करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

केंद्राकडून बुधवारी पुण्याला ३ लाख २५ हजार ७८०, सातारा ५९ हजार ४५०, सोलापूर ३ हजार १००, सांगली २८ हजार ७५०, कोल्हापूर ९६ हजार ७८० अशा प्रमाणात कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले आहे. त्यात पुणे, ग्रामीणला प्रत्येकी १ लाख ४० हजार तर पिंपरीला ४५ हजार ७८० डोस मिळणार आहे. 

आजमितीला महापालिका आणि खासगी रुग्णालये अशी एकूण १०९ आणि ८ शासकीय अशी एकूण ११७ लसीकरण केंद्र आहे. आता नव्याने आणखी २२३ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेकडून केंद्राला पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास शहरातील लसीकरण केंद्राची संख्या तब्बल ३४० इतकी होईल. येत्या १ एप्रिलपासूनच ही सर्व केंद्र सुरू झाले आहे. त्या माध्यमातून दिवसाला जवळपास ७० हजार नागरिकांना लसीकरण करता येऊ शकेल एवढी सोय उपलब्ध होणार आहे.

Web Title: Corona Vaccination: 'Mission 100 Days' in Pune; Vaccination campaign will be done more quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.