राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर; चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला 'हा' मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 07:25 PM2021-04-21T19:25:27+5:302021-04-21T19:25:51+5:30

पहिल्यांदा माणसाला फुकटात मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत कळली आहे. जो पैसे देऊन पण  मिळत नाही.

Corona conditions out of control in the state; Chandrakant Patil suggested 'this' way to the Chief Minister | राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर; चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला 'हा' मार्ग

राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर; चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला 'हा' मार्ग

Next

पुणे: राज्यात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी कुठलाही अभिनिवेश न बाळगता ज्यांच्या नाव आणि फोनला वजन आहे मग यात शरद पवार, नितीन गडकरी, राज ठाकरे,शेकापचे जयंत पाटील यांसारख्या व्यक्तींशी चर्चा करावी. त्यांच्यामार्फत नवनवीन पर्यायांद्वारे ऑक्सिजन, रेमडेसिविर यांच्या उपलब्धतेवर भर द्यावा असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील कोरोना संकट आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यावर भाष्य केले. पाटील म्हणाले,उद्धवजींनी सातत्याने रिसोर्स व्यक्तींच्या संपर्कात राहून ऑक्सिजन  आणि रेमडेसिविरच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करायला हवेत.फक्त मुंबईत राहूनच नाही तर आपापल्या शहरात राहून निर्णय घ्यावे. पुणे शहरात काल रात्री १० रुग्णालयात ऑक्सिजन कमी पडला.ऐनवेळी महापौर आणि आयुक्तांची धावपळ करून तो उपलब्ध करून दिला. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून ते जनतेचे पालक आहेत. त्यामुळे त्यांनी आता पावले उचलणे गरजेचे आहे. 

पहिल्यांदा माणसाला फुकटात मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत कळली आहे. जो पैसे देऊन पण  मिळत नाही. शहरात सुधीर मेहता म्हणून एक गृहस्थ आहे. त्यांनी १५० कोटी रुपये उभे करून कोविड वर खर्च केले आहे जे प्रशासनाने पण नसतील केले. अशा समाजोपयोगी व्यक्ती, संस्था यांच्यासह कोविड विरुद्ध लढा उभारावा अशी विनंती पुण्याच्या महापौरांना केली आहे असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

Web Title: Corona conditions out of control in the state; Chandrakant Patil suggested 'this' way to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.