ठळक मुद्दे गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच बहुमताने जिंकेल, असा विश्वास लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारवरील जनतेचा असंतोष वाढत चालल्याने या निवडणुकीत जनता त्यांच्या मतांच्या माध्यमातून भाजपाचा पराभव करेल, असंही मत मीरा कुमार यांनी व्यक्त केलं.

पुणे-  गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच बहुमताने जिंकेल, असा विश्वास लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारवरील जनतेचा असंतोष वाढत चालल्याने या निवडणुकीत जनता त्यांच्या मतांच्या माध्यमातून भाजपाचा पराभव करेल, असंही मत मीरा कुमार यांनी व्यक्त केलं. पुणे श्रमिक पत्रकार संघाला यावेळी मीरा कुमार यांनी शुभेच्छा दिल्या. 

माध्यमाला स्वातंत्र्याता असावी. सोशल मीडिया सरकारविरोधात जात असल्याच्या प्रश्नावर मीरा कुमार म्हणाल्या की, माध्यमाला विरोध करणं म्हणजे एक प्रकारे लोकशाहीला विरोध केल्यासारखं आहे. गुजरातमधील पाटीदार समुदाय मोठ्या प्रमाणात असून या समुदायाकडे भाजपा सरकारने दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे पेटून उठलेल्या पाटीदारांनी काँग्रेसच्या बाजूने पाठिंबा दिली आहे. जीएसटी लागू केल्यानंतर गुजरातमधील सुरत आणि अहमदाबाद येथील हिरा, कापड व्यापाऱ्यांनीही त्याला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे आता त्यांना मतदानाच्या माध्यमातून संधी मिळणार आहे. 

दरम्यान, गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठीआम्ही प्रयत्न करत आहोत. रणनीतीबाबत विचारले असता,ही रणनीती छुप्या पद्धतीने केली जात असल्याचे म्हणत प्रश्नाला बगल दिली. सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत विचारले असता, सोनिया गांधी लवकरच ब-या  व्हाव्यात, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.