मंगळवारपासून महाविद्यालये बंद , एम फुक्टोचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 01:23 AM2018-09-23T01:23:16+5:302018-09-23T01:23:28+5:30

एम फुक्टोच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार असून त्यामुळे महाविद्यालये बंद राहणार आहेत

 Colleges shut off from Tuesday, M. Fuco's order | मंगळवारपासून महाविद्यालये बंद , एम फुक्टोचा आदेश

मंगळवारपासून महाविद्यालये बंद , एम फुक्टोचा आदेश

Next

ओतूर  - एम फुक्टोच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार असून त्यामुळे महाविद्यालये बंद राहणार आहेत अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व महाविद्यालयातील अध्यापक संघटना, व पुणे जिल्हा (फुक्टो) चे अध्यक्ष डॉ. विठ्ठल शिंंदे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.
प्राध्यापकांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. या साठी एम फुक्टोने वेळोवेळी शासनाकडे मागण्यांसाठी पाठपुरावा केला. शासन जाणून बुजून प्राध्यापकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने मागण्यांसाठी ५ टप्प्यांत विविध प्रकारची आंदोलने केली पण शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे सहाव्या टप्प्यात राज्यातील सर्व महाविद्यालये २५ सप्टेंबर २०१८ पासून बेमुदत बंद आंदोलन सुरु करीत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

प्राध्यापकांच्या मागण्या...
प्राध्यापक भरतीवर असणारी बंदी त्वरित उठवावी. जानेवारी २००४ नंतर लागलेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी वेतन नियामक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे.
समान काम समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित करावी.
सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात .
प्राध्यापकांसाठी व्यथा निवारक यंत्रणा स्थापन करावी .
बेकायदेशीररित्या रोखलेले ७१ दिवसांचे वेतन त्वरित अदा करावे.
नवीन विद्यापीठ कायद्याने विविध प्राधिकरणामध्ये विविध समित्यांवर नामनिर्देशित सदस्य म्हणून केल्या जाणाऱ्या नियुक्त्या कमी करून लोकशाही मार्गाने निवडून येणाºया सदस्यांची संख्या वाढवावी .

Web Title:  Colleges shut off from Tuesday, M. Fuco's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.