रस्त्यावरील मुलांना अभ्यंगस्नानाचा आनंद , सुवासिक तेल-उटणे लावून केले औक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 02:02 AM2018-11-05T02:02:12+5:302018-11-05T02:02:22+5:30

रविवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर रस्त्यावर, फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना रस्त्यावरच रांगोळी घालून पाट, दिव्ये लावून तेल-उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले.

The children on the street have been enjoying the bath | रस्त्यावरील मुलांना अभ्यंगस्नानाचा आनंद , सुवासिक तेल-उटणे लावून केले औक्षण

रस्त्यावरील मुलांना अभ्यंगस्नानाचा आनंद , सुवासिक तेल-उटणे लावून केले औक्षण

Next

पुणे - रविवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर रस्त्यावर, फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना रस्त्यावरच रांगोळी घालून पाट, दिव्ये लावून तेल-उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. माजी उपमहापौर आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी हा उपक्रम आयोजित करून या रस्ता, फुटपाथवरील मुलांना आगळावेगळा आनंद दिला.
आबा बागुल, जयश्री बागुल, अमित बागुल, हर्षदा बागुल, समस्त बागुल कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांकडून या मुलांना सुवासिक तेल-उटणे लावून त्यांचे औक्षण करून मंगलमय वातारणात शाही अभ्यंगस्नान घातले. यानंतर मुलांना नवे कपडे, फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने देखील मिळाली. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात इम्तियाज तांबोळी, सागर आरोळे, अ‍ॅड. चंद्रशेखर पिंगळे, धनंजय कांबळे, गोरख मरळ, महेश ढवळे, योगेश निकाळजे, पप्पू देवकर, हबीद शेख, बाबालाल पोळके, प्रकाश तारू, नितीन गोरे, सुरेश कांबळे, राहुल जगताप आदी सहभागी झाले होते.

अन् मुले
हरखून गेली...
डेक्कन येथे गुडलक चौकात झालेल्या या अनोख्या
उपक्रमात पदपथावर
राहणाºया मुला-मुलींना रविवारची सकाळ सुखद
ठरली.
खेळण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही केवळ परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची
सकाळ रोजगारासाठीच
उजाडते.
आई-वडिलांसह पदपथावर राहणाºया या मुलांची रविवारची सकाळ मात्र आनंददायी ठरली.
कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वच्छता करून घातलेला रांगोळ्यांचा सडा आणि
मांडलेले पाट हे चित्र बघून ती मुले हरखून गेली.

Web Title: The children on the street have been enjoying the bath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.