केमिकलनं भरलेल्या टँकरचा अपघात; दुभाजकाला धडकून भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 08:49 AM2018-07-04T08:49:24+5:302018-07-04T08:52:11+5:30

थिनरने भरलेला टँकरचा दुभाजकाला धडकून अपघात झाला. अपघातादरम्यान टँकरनं अचानक पेट घेतला.

chemicals tanker met with an accident in pune | केमिकलनं भरलेल्या टँकरचा अपघात; दुभाजकाला धडकून भीषण आग

केमिकलनं भरलेल्या टँकरचा अपघात; दुभाजकाला धडकून भीषण आग

Next

पुणे : थिनरने भरलेला टँकरचा दुभाजकाला धडकून अपघात झाला. अपघातादरम्यान टँकरनं अचानक पेट घेतला. भीषण आगीमध्ये टँकर पूर्णतः जळून खाक झाला. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. बुधवारी (4 जुलै) पहाटे हडपसर येथील लोणी टोल नाक्याजवळ ही घटना घडली. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 3.54 वाजण्याच्या दरम्यान थिनरने भरलेल्या टँकरचा अपघात होऊन टँकरनं पेट घेतला. अग्निशामक दलाच्या हडपसर, कोंढवा तसेच मुख्य केंद्रातली एक अशा 3 फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. आगीनं रौद्र रुप धारण केले होते, परिसरात आगीचे मोठ-मोठे लोट पसरत होते. यामुळे खबरदारी म्हणून काही काळासाठी या भागातील वाहतूक थांबवण्यात आली होती.  अग्निशामक दलाच्या 20 जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

Web Title: chemicals tanker met with an accident in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.