केंद्राचे धोरण साखर उद्योगविरोधी -हर्षवर्धन पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 02:43 AM2017-09-13T02:43:22+5:302017-09-13T02:43:22+5:30

केंद्र सरकारने राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना आयकर भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच, कारखान्यांना साखरसाठा मर्यादेचे आदेश काढले आहेत. परिणामी, साखरेचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीतच दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ३ लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे.

Center's policy against sugar industry - Harshavardhan Patil | केंद्राचे धोरण साखर उद्योगविरोधी -हर्षवर्धन पाटील  

केंद्राचे धोरण साखर उद्योगविरोधी -हर्षवर्धन पाटील  

Next

बावडा : केंद्र सरकारने राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना आयकर भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच, कारखान्यांना साखरसाठा मर्यादेचे आदेश काढले आहेत. परिणामी, साखरेचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीतच दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ३ लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. केंद्र शासनाने साखर उद्योगाच्या विरोधातील धोरण बदलावे, असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
शहाजीनगर येथे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. या वेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, ‘‘आगामी हंगामात कारखान्याचे १२.५० टक्के साखर उताºयाचे उद्दिष्ट आहे. मागील गळीत हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे गाळप कमी झाले. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही प्रतिटनास रु. २५०५ दर देण्याचा शब्द आपण पाळला आहे. कारखान्याने उपपदार्थनिर्मितीचे सर्व प्रकल्प उभारले आहेत. आता आगामी काळात गुंतवणुकीसाठी नवीन कर्ज काढण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे येणाºया हंगामात ऊसदरात नीरा-भीमा कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत पुढेच राहील, यात शंका नाही.
या वार्षिक सभेस अ‍ॅड. कृष्णाजी यादव, प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, किरण पाटील, देवराज जाधव, अमरसिंह पाटील, मनोज पाटील, मंगेश पाटील, रघुनाथ राऊत, अनिल पाटील,
श्रीमंत ढोले, धनंजय कोरटकर, तानाजीराव देवकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, महादेव घाडगे, सुरेश मेहेर, महेश जगदाळे, दत्तात्रय शिर्के, विश्वासराव काळकुटे, मोहन गुळवे, नागेश नष्टे, तानाजीराव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

७ लाख टन गाळप नियोजन
कारखान्याने चालू गळीत हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे नियोजन केलेले असून साखर उतारा वाढीसाठी शेतकºयांनी सहकार्य करावे, शेतकºयांनी नवीन ऊस बियाणे वापरावे, एकरी ऊस उत्पादकता वाढवावी, नीरा-भीमा कारखान्याच्या ऊस विकास कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी अहवालवाचन केले. कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Center's policy against sugar industry - Harshavardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे