मुरूम टाकल्याच्या कारणावरून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:56 AM2018-07-24T00:56:48+5:302018-07-24T00:57:02+5:30

कापडदरा येथील घटना; पाच जणांवर गुन्हा दाखल

The cause of the murder of the murum | मुरूम टाकल्याच्या कारणावरून खून

मुरूम टाकल्याच्या कारणावरून खून

Next

मंचर : कापडदरा येथील दोन गुंठे जागेत विहिरीचे डबर व मुरूम टाकल्याच्या कारणावरून रामदास जगन्नाथ वैद (वय ४०, रा. वैदवाडी) यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारुन खून करण्यात आला आहे. त्यांची पत्नी विमल रामदास वैद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राम तात्याबा वाळुंज, रा. पोंदेवाडी, पोपट भिका कापडी, म्हतारबा नानाभाऊ कापडी (दोघेही रा. जारकरवाडी), शिवाजी गेणभाउ दौंड, खंडू दत्तात्रय वारे, (रा. पोंदेवाडी) व संतोष लक्ष्मण वैद, (रा. वैदवाडी) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मंचर पोलीसांनी दिलेल्या माहितीवरुन २६ जूनला काठापूर हद्दीतील वैदवाडी ते पोंदेवाडी या रस्त्यालगत असणाऱ्या गटारात रामदास जगन्नाथ वैद यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या डोक्याला मारहाण झाली होती. वैद यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबियांना या मृत्युबाबतचा संशय होता. गावातील कैलास ज्ञानेश्वर पोंदे याने संतोष वैद याने रामदास वैद व पांडूरंग करंडे यांना काठापूर येथील निमंत्रण ढाब्याजवळ नेले होते. कैलास याने दिलेल्या माहितीवरुन संतोष याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी ढाब्यावर गेल्यावर राम तात्याबा वाळुंज, पोपट भिका कापडी, म्हतारबा नानाभाउ कापडी, शिवाजी दौंड, पांडूरंग बाळासाहेब करंडे, संतोष लक्ष्मण वैद आणि खंडू दत्तात्रय वारे येथे आले. राम वाळुंज याने संतोष वैद यांना मारहाण केली. तसेच तू येथून निघुन जा, तुला कोणी विचारले तर रामदास वैद यास घाटात सोडले असे सांग असे संतोषला सांगण्यात आले. हा सर्व घटनाक्रम पाहिल्यावर रामदास वैद याचा खून झाल्याची खात्री वैद कुटुंबियांना झाली. कापडदरा येथील विहिरीच्या दोन गुंठे जागेत विहीरीचे डबर व मुरुम टाकल्याच्या कारणावरुन पती रामदास वैद यांच्या डोक्यात कशानेतरी मारहाण करुन त्यांचा खून झाल्याची फिर्याद विमल रामदास वैद यांनी मंचर पोलीसांत दिली. पोलीसांनी राम तात्याबा वाळुंज, पोपट भिका कापडी, म्हतारबा नानाभाउ कापडी, शिवाजी गेणभाउ दौंड, पांडूरंग बाळासाहेब करंडे, खंडू दत्तात्रय वारे व संतोष लक्ष्मण वैद यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The cause of the murder of the murum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.