जुन्नर येथे अज्ञात चोरट्यांकडून  रोख रक्कम व दागिने लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 03:37 PM2018-09-18T15:37:42+5:302018-09-18T15:39:33+5:30

दहा ते बारा अनोळखी महिला घरांघरात जावुन हातावर गोंदवायचे आहे का ? अशी विचारणा करण्याच्या बहाण्याने परिसरातील घराची टेहाळणी करत होत्या

cash and jewellery theft from unknown thieves in Junnar | जुन्नर येथे अज्ञात चोरट्यांकडून  रोख रक्कम व दागिने लंपास 

जुन्नर येथे अज्ञात चोरट्यांकडून  रोख रक्कम व दागिने लंपास 

Next

जुन्नर : जुन्नरपोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव सहाणी वरसु बाई मळा येथील घरे अज्ञात चोरट्यानी रविवारी (दि.१६) रात्री फोडुन या घरातील रोख रक्कम व देवाचे चांदीचे दागिने असा ऐवज पळवुन नेला आहे. 
  वडगाव सहाणी येथील दगडु गेणु तांबोळी हे व त्यांचे कुटुंबीय घरात झोपले असताना घराचा दरवाजा व कडी कोयंडा तोडुन चोरट्यानी देवघरात असलेला अर्धा किलो चांदीचा गाठा तसेच कपाटातील रोख रक्कम पाच हजार रुपये रोख चोरुन नेले . तसेच त्यांच्या घराशेजारी तानाजी तांबोळी यांचे घरात प्रवेश करून फोडुन घरातील चार हजार रुपये रोख,चांदीचे तीन पैजणे ,घरातील कपडे तर चंद्रकांत तांबोळी यांचे घरातील सात हजार रुपये रोख व लहु शिंदे यांच्या घरातुन ६५००/- रुपये रोख रक्कम पळवुन नेली. राजेंद्र तांबोळी याचे घर फोडून झोपलेल्या माणसांवर स्प्रे फवारल्याने कोणालाही जाग आली नाही असे फिर्यादी तांबोळी यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद साबळे हे पुढील तपास करत आहे. रविवारी दुपारी वडगाव सहाणी परिसरात दहा ते बारा अनोळखी महिला घरांघरात जावुन हातावर गोंदावयाचे आहे का?अशी विचारणा करण्याच्या बहाण्याने परिसरातील घराची टेहाळणी करत होत्या व रात्री या घरफोड्या झाल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले.  

Web Title: cash and jewellery theft from unknown thieves in Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.