लोहगावात महिलेचा जाळून निर्घृण खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:23 PM2018-05-11T16:23:40+5:302018-05-11T16:23:40+5:30

अनोळखी महिलेच्या जळालेल्या मृतदेहाच्या संदर्भात विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे .

burnt death murder of women in lohgaon | लोहगावात महिलेचा जाळून निर्घृण खून 

लोहगावात महिलेचा जाळून निर्घृण खून 

Next
ठळक मुद्देपुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळला असल्याचा अंदाज डाव्या हातावर एबी व उजव्या हातावर अयोध्या असे इंग्रजीत गोंदलेले

विमाननगर - लोहगाव फॉरेस्ट पार्क येथे एका अनोळखी महिलेचा जाळलेला मृतदेह शुक्रवारी आढळून आला आहे. अज्ञात व्यक्तीने या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळला असल्याचा अंदाज विमानतळ पोलिसांनी व्यक्त केला आहे.या अनोळखी महिलेच्या जळालेल्या मृतदेहाच्या संदर्भात विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह लोगो फॉरेस्ट पार्क येथील पाटील वस्तीजवळ शुक्रवारी( दि.११ मे) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला होता. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. अंदाजे २५ ते ३०वर्षे वयाची ही अनोळखी महिला असून तिच्या अंगावर काही जखमा होत्या. रात्री उशिरा अज्ञात इसमाने तिचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी स्प्रेच्या साहयाने तिचा मृतदेह जाळला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तिचा उजवा पाय थोड्या अंतरावर तुटलेल्या अवस्थेत मिळून आला. तिच्या डाव्या हातावर एबी व उजव्या हातावर अयोध्या असे इंग्रजीत गोंदलेले असून उजव्या हातात काळ्या मण्यांची माळ व पांढरे धातूचे कडे, अंगात निळी जीन्स पँट व निळा जीन्स शर्ट असे मृत अनोळखी महिलेचे वर्णन आहे. 
घटनास्थळी विमानतळ पोलिसांसह गुन्हे शाखा यांचे पथक तातडीने दाखल झाले.  उपायुक्त गणेश शिंदे ,सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील, गुन्हे निरीक्षक विलास सोंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप कोलते करीत आहेत .

Web Title: burnt death murder of women in lohgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.