‘महा फार्म्स’च्या द्वारे शेतमालाचे ब्रॅण्डिंग, राज्यात स्वत:चा ब्रॅण्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 05:52 AM2019-06-23T05:52:47+5:302019-06-23T05:53:04+5:30

आनंद मिल्क युनियन लिमिटेड अर्थात ‘अमूल’ने गुजरातमधील दूध उत्पादकांच्या जीवनात क्रांती आणली.

Branding of the land through 'Maha Pharma', own brand in the state | ‘महा फार्म्स’च्या द्वारे शेतमालाचे ब्रॅण्डिंग, राज्यात स्वत:चा ब्रॅण्ड

‘महा फार्म्स’च्या द्वारे शेतमालाचे ब्रॅण्डिंग, राज्यात स्वत:चा ब्रॅण्ड

Next

- विशाल शिर्के
पुणे : आनंद मिल्क युनियन लिमिटेड अर्थात ‘अमूल’ने गुजरातमधील दूध उत्पादकांच्या जीवनात क्रांती आणली. तोच आदर्श घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांसाठी राज्याचा ‘महा फार्म्स’ ब्रॅण्ड आणला आहे. त्या अंतर्गत तब्बल १९० हून अधिक उत्पादने बाजारात आणली जाणार आहेत. त्यासाठी ३०० विक्री केंद्रांच्या (कॉप शॉप) माध्यमातून बाजारात उतरण्याची तयारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एमसीडीसी) या सरकारने स्थापन केलेल्या कंपनीच्या मार्फत ‘महा फार्म्स’ हा ब्रॅण्ड बाजारात आणण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये पंजाबमधे या ब्रॅण्डचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर राज्यात पुण्यातील बावधन येथील पेबल्स सोसायटी, ठाणे, मुंबई आणि नेरुळ येथील निवडक ठिकाणी मोजकीच उत्पादने घेऊन या शॉपची सुरुवात करण्यात आली होती. प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पॅक्स), शेतकरी कृषी उत्पादन कंपनी आणि बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू कॉप शॉपच्या माध्यमातून उपलब्ध होतील.

सध्या, शहरी भागात १६२ आाणि ग्रामीण भागात ५४१ विक्री केंद्रातून मोजक्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात मसाले, गूळ, सुकामेवा अशा उत्पादनांचा समावेश आहे. त्यातही कायमस्वरुपी असणारी विक्री केंद्र केवळ पाच ते सहाच आहेत. उरलेली विक्री फिरत्या वाहनांच्या माध्यमातून होते. आता ‘कॉप शॉप’ आणि ग्राहकपेठे सारख्या सहकारी संस्था, मॉल्स यांच्याशीही करार करण्यात येईल. त्यामुळे लवकरच ग्राहकांना शेतकऱ्यांचा स्वत:च्या ब्रॅण्डच्या वस्तू विकत मिळतील.

‘कॉप शॉप’मध्ये मिळतील या वस्तू
मिरची पूड, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर डाळ, पीठ, आवळा कॅण्डी, मध, लोणचे, तूप, चहा मसाला, सेंद्रीय उत्पादने, रसायन विरहीत गूळ, फळांचा रस, कांदा मसाला, शेंगदाणा चटणी, सुका मेवा आदी.

ग्राहक - शेतकरी...
दोघांच्या फायद्यासाठी!

अटल अर्थसहाय्य योजनेतून राज्यात लवकरच ३०० हून अधिक ‘कॉप शॉप’ उभारले जातील. पाचशे ते एक हजार सदनिका असलेल्या सहकारी गृहसंस्था, ‘ग्राहक पेठ’ यासारख्या सहकारी संस्था, अपना बाजार, भारती बाजार, सह्याद्री बाजार आणि नामांकित कंपन्यांच्या मॉलशी करार केले जातील. ग्राहकांना स्वस्तात माल मिळेल याची काळजी घेण्यात येणार आहे. - विजय गोफणे,
राज्य व्यवसाय, विपणन अधिकारी,
सहकार विकास महामंडळ

८० कोटी रुपयांना मंजुरी
अटल अर्थसहाय्य योजनेला मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली असून, त्या अंतर्गत ‘कॉप शॉप’साठी ८० कोटी ४ लाख ६९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.

Web Title: Branding of the land through 'Maha Pharma', own brand in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.