वादावादीत डोक्यात लोखंडी वस्तुने मारलेले आगार प्रमुख व संबंधित चालक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 07:41 PM2018-11-02T19:41:29+5:302018-11-02T19:43:56+5:30

चौकशी पुर्ण होईपर्यंत ते निलंबित असतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Because of dispute, the PMPML head and driver suspended. | वादावादीत डोक्यात लोखंडी वस्तुने मारलेले आगार प्रमुख व संबंधित चालक निलंबित

वादावादीत डोक्यात लोखंडी वस्तुने मारलेले आगार प्रमुख व संबंधित चालक निलंबित

Next

पुणे : किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादावादीत चालकाच्या डोक्यात लोखंडी वस्तुने मारलेले हडपसर आगाराचे प्रमुख व संबंधित चालकाला निलंबित करण्यात आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने शुक्रवारी (दि. २) हा निर्णय घेतला. चौकशी पुर्ण होईपर्यंत ते निलंबित असतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

           हडपसर आगारमध्ये सोमवारी दुपारी ही घटना घडली होती. आगारप्रमुख नारायण करडे व चालक दिलीप पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी (दि. २९) दुपारी हडपसर आगारामध्ये काही कारणावरून चालक व आगारप्रमुखामध्ये वाद सुरू झाला. या वादातून आगारप्रमुखांकडून चालकाच्या डोक्यात लोखंडी वस्तुने मारल्याची तक्रार संबंधित चालकाने केली आहे. तर संबंधित चालकाने मद्यप्राशन केल्याने ते घसरून पडले, असे आगारप्रमखांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे आगारातील कर्मचारी व अधिकाºयांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. या संपुर्ण घटनेची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने दोघांनाही सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. 

          पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, घडलेली घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून तसेच सुरक्षा विभागाने दिलेल्या अहवालावरून दोघांनाही शनिवारपासून निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाईल.

Web Title: Because of dispute, the PMPML head and driver suspended.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.