मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला आजन्म कारावास

By admin | Published: January 12, 2017 02:21 AM2017-01-12T02:21:42+5:302017-01-12T02:21:42+5:30

आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा लैंगिक छळ केल्याबद्दल बापाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़

Baba Ajnem imprisonment for raping a girl | मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला आजन्म कारावास

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला आजन्म कारावास

Next

पुणे : आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा लैंगिक छळ केल्याबद्दल बापाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़ विशेष न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांनी हा निकाल दिला़
ही घटना चाईल्डलाईन संस्थेच्या मदतीने उघडकीस आली होती़ ही १६ वर्षांची मुलगी हडपसर येथे राहत असून नववीत शिकत होती़ या मुलीने २३ सप्टेंबर २०१४ रोजी या हेल्पलाईनवर शाळेतून फोन करून आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली़ संस्थेच्या सविता दिवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांच्या संमतीने या मुलीची भेट घेतली़ तिने सांगितलेली हकीकत त्यांनी पोलिसांना कळविली़

Web Title: Baba Ajnem imprisonment for raping a girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.