बाहुबली हा खऱ्या अर्थाने अहिसंक राजा - देवदत्त पट्टनाईक

By श्रीकिशन काळे | Published: November 26, 2023 05:26 PM2023-11-26T17:26:38+5:302023-11-26T17:27:04+5:30

सध्या बाहुबली या शब्दाला वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे, बाहुबली हा हिंसक नव्हताच, तो अहिंसेचा पूजक होता

Baahubali is a true non violent king Devdutt Patnaik | बाहुबली हा खऱ्या अर्थाने अहिसंक राजा - देवदत्त पट्टनाईक

बाहुबली हा खऱ्या अर्थाने अहिसंक राजा - देवदत्त पट्टनाईक

पुणे : सध्या आपल्याकडे हिंसक व्यक्तीरेखा या अधिक ग्लॅमराईज केल्या जात आहेत. त्याला चित्रपटामुळे अधिक प्रोत्साहन मिळाले. खरंतर जैन धर्मियांमध्ये बाहुबली हे अहिंसक प्रतिक आहे, मात्र सध्या बाहुबली या शब्दाला वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे, बाहुबली हा हिंसक नव्हताच, तो अहिंसेचा पूजक होता, असे प्रतिपादन कथाकार, लेखक देवदत्त पट्टनाईक यांनी केले.

पुण्यातील दखनी अदब फाउंडेशनच्या वतीने एकाहून एक सरस कविता, गझल्स, मुलाखती, चर्चासत्रे, नाटक आणि सांगीतिक कार्यक्रम यांची रेलचेल असलेल्या चौथ्या दोन दिवसीय डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात पट्टनाईक बोलत होते.

जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे होत असलेल्या या महोत्सवास यावेळी महोत्सवाच्या मुख्य समन्वयिका मोनिका सिंग, पद्मश्री पं. रामदयाल शर्मा, शाहीर सुरेश कुमार वैराळवर, सलीम आरिफ, फाउंडेशनचे जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवी तोमर, युवराज शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयोजित 'डिकोडिंग दी स्टोरीज ऑफ गॉड्स अँड सेंट्स’ या मुलाखतपर कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखिका सुधा मेनन यांनी पट्टनाईक यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “जैन धर्मीय हे मुख्यत्वे व्यापारी होते. सुरुवातीला हिशेब ठेवण्यासाठीच लेखन सुरु झाले. यातच पुढे शून्य आणि इन्फिनिटी यांची भर पडली. जैन धर्मीयांची ही गणितीय देणगी जगासाठी उपयुक्त ठरली.”

सरस्वती अर्थात विद्या ही भारतीय ज्ञानाचे प्रतिक आहे. आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात यावर बोलले जात नाही. आपल्या शिक्षणात देखील सरस्वतीला महत्त्व नाही. आपण अभ्यास करतो ते चांगली नोकरी मिळविण्यासाठी, आपल्याला दुर्गेच्या रुपात बदलाचे प्रतिनिधी, साक्षीदार व्हायचे असते. मात्र शिकण्यासाठी ज्ञानप्राप्तीसाठी आपण ज्ञानग्रहण करत नाही, असे परखड मत पट्टनाईक यांनी व्यक्त केले.

यानंतर मराठी लेखकांशी गप्पांचा ‘मराठी साहित्यसंवाद – त्रिधारा’ हा कार्यक्रम झाला. यामध्ये प्रवीण बांदेकर, मेघना पेठे, आसाराम लोमटे यांच्याशी रणधीर शिंदे यांनी संवाद साधला. यानंतर लुब्ना सलीम आणि हर्ष छाया या कलाकारांचे ‘हमसफर’ हे हिंदी नाटक सादर झाले.

Web Title: Baahubali is a true non violent king Devdutt Patnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.