पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 09:21 PM2018-06-15T21:21:48+5:302018-06-15T21:21:48+5:30

पूर्वी झालेल्या भांडणातून सुमारे वीस जणांच्या टोळक्याने चौघांना मारहाण केली तसेच एका युवकावर कोयत्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

attack on youth due to past back quarrel case | पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार

पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार

Next

पुणे : पूर्वी झालेल्या भांडणातून सुमारे वीस जणांच्या टोळक्याने चौघांना मारहाण केली तसेच एका युवकावर कोयत्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नाना पेठेत डोके तालीमजवळ गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा  प्रकार घडला. याप्रकरणी ओंकार साळुंखे (वय १९, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वीस जणांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार साळंखे हे त्याचे मित्र अनिकेत काळे, मुनाफ पठाण, सुरेश बंड आणि मरळ यांच्यासह नाना पेठेतील डोके तालीम बाल मंडळाजवळ उभा होते. यावेळी तेथे वीस जणांचे टोळके दाखल झाले. त्यातील एका आरोपीचे अनिकेत काळे याच्यासोबत पूर्वी भांडण झाले होते. त्यावादातून आरोपींनी काळेवर कोयत्याने वार करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यामध्ये काळे हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक ए. डी. पोमण करीत आहेत.

Web Title: attack on youth due to past back quarrel case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.