एटीएसकडून पुण्यात आणखी शस्त्रसाठा जप्त, नालासोपारा, पुण्यात पुन्हा छापे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 05:12 AM2018-08-14T05:12:06+5:302018-08-14T05:12:27+5:30

हिंदुत्ववादी संघटनेच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्या कसून चौकशीनंतर एटीएसने नालासोपारा आणि पुण्यामध्ये छापे मारले.

ATS seizes more weapons in Pune, raids again in Nalasopara, Pune | एटीएसकडून पुण्यात आणखी शस्त्रसाठा जप्त, नालासोपारा, पुण्यात पुन्हा छापे  

एटीएसकडून पुण्यात आणखी शस्त्रसाठा जप्त, नालासोपारा, पुण्यात पुन्हा छापे  

Next

मुंबई - हिंदुत्ववादी संघटनेच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्या कसून चौकशीनंतर एटीएसने नालासोपारा आणि पुण्यामध्ये छापे मारले. त्यात शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांच्या वाहतुकीसाठी वापरलेली कार व मोटारसायकलसह आणखी शस्त्रसाठा, महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
राऊत याच्या घर आणि दुकानात गुरुवारी छापा टाकून एटीएसने शस्त्रसाठा जप्त केला. एटीएसने रविवारी पुन्हा छापे मारून नालासोपाऱ्यातून ५ गावठी पिस्तुलांसह ३ अर्धवट बनावट पिस्तुले, ९ मि.मी.ची ११ काडतुसे, ७.५ मि.मी.ची ३० काडतुसे आणि शस्त्रांस्त्रांचे सुटे भाग हस्तगत केले.
एटीएसने पुण्यात छापे मारून शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांच्या वाहतुकीसाठी वापरलेली कार व मोटारसायकल जप्त केली. लॅपटॉप ६ हार्डडिस्क, ५ पेनड्राइव्ह, ९ मोबाइल, सिमकार्ड्स, वायफाय डोंगल आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या १३ जणांची कसून चौकशी सुरू आहे.

Web Title: ATS seizes more weapons in Pune, raids again in Nalasopara, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.