मुनीश्री प्रसन्नसागरजी यांचे आगमन

By admin | Published: March 26, 2017 02:08 AM2017-03-26T02:08:19+5:302017-03-26T02:08:19+5:30

दिगंबर जैन मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज यांचे शनिवारी सकाळी पुण्यात आगमन झाले़ सिंहगड रस्त्यावरील

Arrival of Munishri Prasinsa Nagarji | मुनीश्री प्रसन्नसागरजी यांचे आगमन

मुनीश्री प्रसन्नसागरजी यांचे आगमन

Next

पुणे : दिगंबर जैन मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज यांचे शनिवारी सकाळी पुण्यात आगमन झाले़ सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे दिगंबर जैन समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले़ बंगळुरूहून सातारामार्गे पायी प्रवास करीत आलेले प्रसन्नसागरजी महाराज यांच्यासमवेत मुनीश्री पीयूषसागरजी महाराज आणि श्री पर्वसागरजी महाराज आहेत़
प्रसन्नसागरजी महाराज पुण्यात प्रथमच आले असून, पुण्यातील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेशेजारील जैन सांस्कृतिक मंडळ येथे रविवारी (२६ मार्च रोजी) सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाविकांना त्यांचे दर्शन घेता येऊ शकेल, अशी माहिती जैन सहयोगचे अध्यक्ष मिलिंद फडे, जितेंद्र शहा आणि सुजाता शहा यांनी दिली़ मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनी २७ वर्षांपूर्वी दीक्षा घेऊन संपूर्ण भारतभरात आतापर्यंत सुमारे ८० हजार किमी पायी प्रवास केला़ महाराज वर्षांत १०० दिवस मौन आणि १०० ते १५० दिवस  निरंकार उपवास करतात़ मुनीश्री जयपूर येथे चातुर्मासासाठी जात आहेत़
(प्रतिनिधी)

Web Title: Arrival of Munishri Prasinsa Nagarji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.