अॅमेझॉनने पुण्यात सुरु केला फूड रिटेलिंग व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 09:01 PM2018-02-19T21:01:24+5:302018-02-19T21:01:40+5:30

ऑनलाइन क्षेत्रातील ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने फूड रिटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन डॉन इनवर एका व्हेंडरच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरु आहे.

Amazon started retailing business in Pune | अॅमेझॉनने पुण्यात सुरु केला फूड रिटेलिंग व्यवसाय

अॅमेझॉनने पुण्यात सुरु केला फूड रिटेलिंग व्यवसाय

Next

पुणे : ऑनलाइन क्षेत्रातील ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने फूड रिटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन डॉन इनवर एका व्हेंडरच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरु आहे. सध्या पुण्यात ही सर्व्हिस चालू आहे. यामध्ये प्रॉडक्ट्सची विक्री अॅमेझॉन रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याचबरोबर, असे समजते की येत्या तीन महिन्यात देशभरात अॅमेझॉन फूड रिटेलिंगचा व्यवसाय सुरु करणार आहे.  
गेल्या वर्षी फूड प्रॉडक्टस् ई-रिटेलिंग करण्यासाठी सरकारने अॅमेझॉनला 50 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली होती. यामध्ये कंपनी येथे बनविण्यात येणारे प्रॉडक्टस् आणि पॅकेज्ड फूड प्रॉडक्ट्सची विक्री ऑफलाइन आणि ऑनलाइन करण्यात येणार आहे. याआधी सरकारने 2016 मध्ये शेतक-यांना मदत करण्यासाठी आणि रोजगार वाढविण्यासाठी या क्षेत्रात 100 टक्के एफडीआयला मंजुरी दिली होती. दरम्यान, अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही भारतात फूड रिटेल व्यवसायात टिकून राहण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे, असे सांगत त्यांनी याबाबत आणखी माहिती दिली नाही. 
2016 मध्ये फूड ई-कॉमर्स या क्षेत्रात 100 टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली आहे. त्यावेळी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांनी टेस्को  आणि मार्क्स अॅण्ड स्पेंसर्स यासारख्या मोठ्या कंपन्या भारतात आकर्षित करण्यासाठी लंडनमध्ये रोड शो केला होता. दरम्यान, त्यावेळी याला म्हणावा तसा काही प्रतिसाद मिळाला नव्हता.  
 

Web Title: Amazon started retailing business in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.