तक्रार दाखल करून न घेतल्याने पोलीस ठाण्यातच घेतले रॉकेल ओतून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 09:33 PM2019-04-11T21:33:31+5:302019-04-11T21:34:00+5:30

प्रेरणा मदने यांच्या पतीवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये ३७६ चा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फियार्दीच्या भावाने  जबरदस्ती केल्याची तक्रार या महिलेले दिली आहे. हि तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने हि तक्रार आम्ही दाखल केली नाही .म्हणून तिने आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला.    

After lodging a complaint, the police took out the kerosene | तक्रार दाखल करून न घेतल्याने पोलीस ठाण्यातच घेतले रॉकेल ओतून

तक्रार दाखल करून न घेतल्याने पोलीस ठाण्यातच घेतले रॉकेल ओतून

googlenewsNext

हडपसर: पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याच्या कारणावरून निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीने हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात स्वत: वर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.


प्रेरणा दत्तात्रय मदने असे महिलेचे नाव आहे. महिलेने ३ एप्रिल रोजी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्याची दखल हडपसर पोलिसांनी घेतली नाही. असा आरोप केला आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रेरणा मदने या हडपसर पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तेथील पोलीस कर्मचाºयांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले असून  त्यांच्यावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले कि प्रेरणा मदने यांच्या पतीवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये ३७६ चा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फियार्दीच्या भावाने  जबरदस्ती केल्याची तक्रार या महिलेले दिली आहे. हि तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने हि तक्रार आम्ही दाखल केली नाही .म्हणून तिने आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला.    


प्रेरणा मदने या निलंबित सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने यांच्या पत्नी आहेत. पोलीस कर्मचारी राहूल वेताळ यांनी त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याची तक्रार त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात केली आहे. परंतु पोलीस त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर झालेल्या अन्यायाला दाद दिली नाही. तसेच अनेक प्रकारे माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राहूल वेताळ व त्याच्या नातेवाईकांनी मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला जीवन नकोसे झाले आहे. पोलीसही या गंभीर तक्रीरीची दखल घेत नाहीत. माझ्यावर व माझ्या पतीवर खोटे गुन्हे दाखल करण्याची भिती दाखवत आहेत. त्यामुळे जीवन संपवून घेणे हा एकमेव पर्याय आहे. अशी त्यांनी चिट्टी लिहून आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला.

Web Title: After lodging a complaint, the police took out the kerosene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.