त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री बनेश्वर महादेवाला विविधरंगी फुलांच्या पाकळ्याची व दिव्यांची आरास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 05:34 PM2023-11-27T17:34:49+5:302023-11-27T17:35:44+5:30

फुलांच्या आकर्षक सजावटीबरोबरच श्री बनेश्वर मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाले होते

Adoration of colorful flower petals and lamps to Shri Baneshwar Mahadev on the occasion of Tripurari Poornima | त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री बनेश्वर महादेवाला विविधरंगी फुलांच्या पाकळ्याची व दिव्यांची आरास

छायाचित्र - सौरभ भुतकर

नसरापुर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नसरापूर येथील श्री बनेश्वर मंदिरातील या शिवालयात शिवलिंगाभोवती विविध रंगांच्या फुलांची नयनरम्य सजावट करण्यात आली.
              
पवित्र श्री बनेश्वर महाराजांच्या शिवलिंगाभोवती गुलाबासह अनेक विविध जातीच्या आणि विविध रंगांच्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला. श्री बनेश्वर महादेव शिवलिंगाभोवती फुलांची आरास करणे तसेच जिकिरीचे असले तरी कृष्णा पाठक हे कलात्मकतेने ते फुलांची सजावट करतात. याकामी त्यांना मंदिराचे अध्यक्ष पुरुषोत्तम दातार ,सचिव अनिल गयावळ, काशिनाथ पालकर, आबासाहेब यादव, ज्योती चव्हाण, सतिश वाल्हेकर, दत्तात्रेय वाल्हेकर, सुभाष चव्हाण, प्रसन्न गयावळ, विजय जंगम, सुशील विभुते, शुभम निकम, चिंचकर, नवनाथ शिर्के आदींनी मदत केली.
       
या सजावटी या फुलांच्या आकर्षक सजावटीबरोबरच श्री बनेश्वर मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाले होते. लक्ष लक्ष या दिव्यांच्या दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री बनेश्वर मंदिराचे कळसाचे नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने महादेव देवस्थान ट्रस्टने मंदिरावर आकर्षक विविधरंगी विद्युत रोषणाई करु शकले नाही.

Web Title: Adoration of colorful flower petals and lamps to Shri Baneshwar Mahadev on the occasion of Tripurari Poornima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.