पैशाचा हिशेब न दिल्यास कारवाई, मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानाची गाव बैठक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:29 AM2017-10-17T02:29:58+5:302017-10-17T02:30:02+5:30

नारायणगावचे ग्रामदैवत असलेल्या मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानाचा पैसा हडप करण्याचा प्रयत्न करणाºयांनी गावाच्या बैठकीत येऊन पैशाचा हिशेब द्यावा; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानाच्या गाव

Action, Mukta Bai Devi and Village of Kaloba Devasthan, if not paid for accounting of money | पैशाचा हिशेब न दिल्यास कारवाई, मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानाची गाव बैठक  

पैशाचा हिशेब न दिल्यास कारवाई, मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानाची गाव बैठक  

Next

नारायणगाव : नारायणगावचे ग्रामदैवत असलेल्या मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानाचा पैसा हडप करण्याचा प्रयत्न करणाºयांनी गावाच्या बैठकीत येऊन पैशाचा हिशेब द्यावा; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानाच्या गाव बैठकीत विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक व देवस्थानाचे ट्रस्टी संतोष खैरे यांनी दिला आहे.
दरम्यान, नियोजित नूतन समाजमंदिराच्या बांधकामास १ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव ग्राम विकास मंत्रालयात सादर करण्यात आल्याची माहिती ट्रस्टींनी दिली.
या बैठकीला योगेश बाबू पाटे, एकनाथ शेटे, शिवाजीराव खैरे, अशोक पाटे, संतोष वाजगे, डी. के. भुजबळ, विकास तोडकरी, दादाभाऊ खैरे, आल्हाद खैरे, आशिष माळवदकर, सुजित खैरे, दयानंद पाटे, बाळासाहेब पाटे, विजय वाव्हळ, दशरथ खैरे, जयेश कोकणे, अजित वाजगे,
नितीन शेंडे, संतोष दांगट, गणेश वाजगे, सिद्दीक शेख, रशीद् इनामदार, अरिफ आत्तार, पुजारी भास्कर निबाळकर, व्यवस्थापक राजेश गाडेकर आदी उपस्थित होते.

मुक्ताबाई देवीच्या मंदिरात नारायणगाव आणि वारूळवाडी ग्रामस्थांची दुसरी ग्रामबैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. नियोजित समाज मंदिराच्या बांधकामासंदर्भात नियोजन व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व ट्रस्टींनी लाखो रुपयांचा हिशेब दसºयापर्यंत गाव बैठकीत दिला नसल्याने संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचा ठराव व जुन्या ट्रस्टीच्या बनावट सह्या करून नवीन ट्रस्ट तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Action, Mukta Bai Devi and Village of Kaloba Devasthan, if not paid for accounting of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे